इंजिनिअर्स अॅन्ड आर्किटेक्टस् इचलकरंजी यांचे तर्फे एक दिवसीय टेक्निकल परिसंवाद मेळावा

असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स अॅन्ड आर्किटेक्टस् इचलकरंजी यांचे तर्फे शनिवार दि.२४ रोजी एक दिवसीय टेक्निकल परिसंवाद मेळावा

ARCH-TECH-2024 Design Connect with Technology
इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी महानगरपालिकेची वाढती लोकसंख्या व केंद्राची प्रत्येक व्यक्तीला घर या योजनेमुळे बांधकाम क्षेत्रातील निर्माण झालेल्या गरजा व त्याकरिता लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर तसेच बांधकाम क्षेत्रात येणाऱ्या काळातील उत्क्रांती व नवनवीन कल्पना तसेच त्यामध्ये येणाऱ्या अडचणींची सोडवणूक इत्यादी विषयांवर बांधकाम क्षेत्रातील नामवंत समजले जाणारे आंतराष्ट्रीय स्तरावर काम करणारे आर्किटेक्ट व इंजिनिअर यांच्या उपस्थितीत इचलकरंजी येथील घोरपडे नाट्यगृह येथे असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स अॅन्ड आर्किटेक्टस् इचलकरंजी यांचे तर्फे शनिवार दि.२४ रोजी ARCH-TECH-2024 Design Connect with Technology या एक दिवसीय टेक्निकल परिसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे.त्यामध्ये मुंबईहून आर्किटेक्ट चंद्रशेखर कानिटकर,आर्किटेक्ट कृष्णमूर्ती,तसेच पुणे येथील इंजिनियर शब्बीर लोखंडवाला यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.या कार्यक्रमाकरिता इचलकरंजी तसेच कोल्हापूर व सांगली परिसर येथील इंजिनिअर्स व आर्किटेक्टस् यांनी या परिसवांदाचा लाभ घावा असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष इंजिनियर विवेक सावंत यांनी आढावा बैठकीत केले आहे.यावेळी सेक्रेटरी इंजिनियर सुधाकर झोले,खजिनदार इंजिनियर राजेंद्र खंडेराजूरी, इंजिनियर विक्रम जैन,इंजिनियर शरद लोकरे, इंजिनियर रियाज सत्ती,आर्किटेक्ट विकास नाईक, आर्किटेक्ट विठ्ठल तोडकर,आर्किटेक्ट सचिन बोरा, आर्किटेक्ट अभय पिसे,इंजिनियर भरत केटकाळे, इंजिनियर नितीन शेट्टी, इंजिनियर गिरीष मोकाशी, इंजिनियर महेश चौगुले आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाकरिताचे रजिस्ट्रेशन ऑनलाईन उपलब्ध आहे.तसेच कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी ९ वाजल्यापासून ऑफलाईन रजिस्ट्रेशनची व्यवस्था केली आहे.तरी इचलकरंजी शहर परिसरामधील सर्व बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींनी या परिसंवादास उपस्थित रहावे असे आवाहन असोसिएशन वतीने करण्यात आले आहे.
Spread the love
error: Content is protected !!