मुंबई येथे २६ फेब्रुवारीला राज्यस्तरीय पत्रकारांचे अधिवेशन – डॉ.दगडू माने

मुंबई येथे २६ फेब्रुवारीला राज्यस्तरीय पत्रकारांचे अधिवेशन – डॉ. दगडू माने

व्हॉइस ऑफ मीडिया तर्फे आयोजन

कोल्हापूर जिल्ह्यातून बहुसंख्य पत्रकार अधिवेशनाला जाणार

शिरोळ / प्रतिनिधी

मुंबई येथे व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे सोमवारी २६ फेब्रुवारीला सायंकाळी चार वाजता मंत्रालयाच्या समोरील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे राज्यातील पत्रकारांचे अधिवेशन होणार आहे .पत्रकार आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्हॉइस ऑफ मीडिया पॉझिटिव्ह जनालिझम अवॉर्ड्स आणि व्हॉईस ऑफ मीडिया महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार वितरण सोहळा या अधिवेशनात संपन्न होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून बहुसंख्य पत्रकार मुंबई अधिवेशनात सहभागी होणार आहेत अशी माहिती व्हाईस ऑफ मीडिया कोल्हापूर जिल्हा प्रवक्ते डॉ दगडू माने यांनी दिली.
ते म्हणाले , व्हॉइस ऑफ मीडिया कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ , हातकणंगले तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील पत्रकारांचे उत्कृष्ट संघटन करण्यात आले आहे. व्हाईस ऑफ मीडियाने पत्रकारांच्या इतर सोयी-सुविधांसोबतच सकारात्मक पत्रकारितेसाठीदेखील एक पाऊल पुढे टाकले आहे. महाराष्ट्रातील २० संपादकांनी एकत्रित येऊन या संघटनेची स्थापना केली आहे. देशभरात प्रत्येक तालुक्यात संघटना पोहोचलेली असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही आजवर सुमारे ४० पेक्षा अधिक देशांमध्ये संघटनेचे काम सुरु आहे. सोमवारी २६ फेबुवारी रोजी होणाऱ्या सोहळ्यास अनेक मंत्री ,सामाजिक मान्यवर, मंत्रालयीन सचिव आदींची उपस्थिती असणार आहे. व्हॉईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी तसेच शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातून बहुतांशी पत्रकार या अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याचे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा प्रवक्ते डॉ. दगडू माने यांनी दिली.

Spread the love
error: Content is protected !!