मेष – घरातील ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला ऐका,बँकेतून कर्ज आज तुम्हाला मिळेल,आई-वडिलांच्या सेवेत व्यतीत कराल.
वृषभ – कामानिमित्त अचानक बाहेरगावी जावे लागणार,भावा-बहिणीच्या लग्नातील अडथळा ज्येष्ठ सदस्याच्या मदतीने सुटेल, मुलांशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घ्याल, कुटुंबातील सदस्यांसाठी वेळ द्याल.
मिथुन – आजचा दिवस उत्तम आर्थिक स्थिती चांगली राहील,उत्पन्न वाढीसाठी लक्ष द्याल,नवीन व्यवसायसाठी पाठपुरावा कराल, सामाजिक क्षेत्राशी लोकांना चांगल्या लाभ मिळेल,फालतू खर्च टाळा,
कर्क – नोकरदारांसाठी उत्तम दिवस नोकरीत मोठी संधी मिळणार,उच्च शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल, विद्यार्थ्यांना परदेशातून शिक्षण घेण्याची संधी मिळेल.पैसे खर्च कराल,
सिंह – आजचा दिवस उत्तम राहील आई-वडिल आशीर्वादाने वडिलोपार्जित संपत्ती मिळेल, किरकोळ करणातून कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत वाद होईल, शांत स्वभावाने रागावर नियंत्रण मिळवा,शारीरिक व्याधी वाढू शकते,
कन्या – प्रॉपर्टी,कोर्ट,कौटुंबिक रखडलेली कामे पूर्ण कराल,सर्व कामे धाडसाने पूर्ण करावी लागतील,आज किरकोळ कारणातून जोडीदाराची तब्येत बिघडू शकते.त्यामुळे घरात थोडा तानाव राहील.
तुला – आजचा दिवस निवांत रहाल,तुमच्या जोडीदाराला बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखाल.घरात व व्यवसाय ठिकाणी आनंदी वातावरण राहील,आज मुलांच्या समस्याकडे थोडं लक्ष द्या,
वृश्चिक -किरकोळ कारणातून घरी-ऑफिसमध्ये
आज काहीसे उदास आणि अस्वस्थ वाटेल,घर किंवा व्यवसायात कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या अन्यथा नुकसान होईल,जुने वाद-विवाद आज मिटतील.शासकीय नोकरीत करणाऱ्या लोकांनी काळजीपूर्वक काम करा,
धनु – स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी शिक्षकांचा मदतीने अडचणींवर मात करतील, दुसऱ्याला मदत करण्याची इच्छा असेल, गरिबांवर मदत कराल.पोटदुखी,थकवा, डोकेदुखी,ताप अशा आरोग्याच्या समस्या राहील
मकर -आजचा दिवस व्यवसायिक मंडळीसाठी आनंदाचा राहील,अनावश्यक खर्च वाढेल,चालू व पुढील मिळणारे उत्पन्न लक्षात घेऊन खर्च करा. अनेक वर्षे खडलेली सर्व कामे पूर्ण होतील,किरकोळ जागेच्या वादारून भावासोबत असणारा वाद संपेल.
कुंभ – आजचा दिवशी आपणास नशिबाची पूर्ण साथ मिळेल.नोकरी घरातील असलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल,नवीन काम सुरू करण्याचा विचार असेल तर करू शकता नशिबाची ही पूर्ण साथ मिळेल, तुम्हाला खूप फायदा होईल. आज कुटुंबासोबत बाहेर प्रवासाचा बेत असेल
मीन – या राशीच्या लोकांसाठी खूप उत्तम दिवस आहे,अनेक वर्षे प्रलंबित कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागेल.त्यामुळे कुटूंबात मन प्रसन्न होईल.आज सामाजिक क्षेत्रातील मंडळींना मान सन्मान मिळाल्याने मनोधैर्यही वाढेल. मनमिळावू व आनंदी स्वभावामुळे घरात आणि नोकरीच्या ठिकाणी चांगले आणि उत्साही वातावरण असेल.