‘ती’ बिबट्याची पिल्ले नाहीत,वनविभागाचा खुलासा

कोथळीत बिबट्याची पिल्ले : ऊसतोड मजूर नागरिक भयभित.

वाघाटी या जातीची रान मांजराची पिल्ले नागरिकांनी घाबरून जाऊ नये-वन्यजीव प्रमुख प्रदीप सुतार

जयसिंगपूर / प्रतिनिधी

कोथळी येथील नदी पाणवटेच्या रस्त्या लगतच्या महावीर गारे यांच्या शेतात ऊसतोड चालू असताना बिबट्या सदृश्य दोन पिल्ले आढळल्याने ऊसतोड मजूर व शेतकरी नागरिकांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

शेतकऱ्यांनी तात्काळ वनरक्षक अरुण खामकर यांना माहिती दिली, काही वेळातच महाराष्ट्र राज्य वन विभागाच्या वन्यजीव बचाव पथक कोल्हापूर कोल्हापूर येथील वन्यजीव बचाव पथक या ठिकाणी दाखल झाले.

वन्यजीव बचाव पथकाचे प्रमुख प्रदीप सुतार यांनी या पिल्लांची पाहणी केली व ही पिल्ले बिबट्याची नसून वाघाटी म्हणून एक रान मांजराची जात आहे.असे सांगण्यात आले.त्याचबरोबर वन विभागाने या दोन पिल्लांना ट्रॅप लावले

व दोन दिवस त्या ठिकाणी त्या पिल्लांची आई त्याना नेण्यासाठी येते का हे बघण्यात आले.पण तिसऱ्या दिवशी पाऊस पडून त्या ठिकाणी पाणी साचल्याने ती रान मांजर तिथे येण्याची शक्यता धूसुर झाल्याने

वन्यजीव बचाव पथक यांनी त्या पिल्लांना फॉरेस्ट हॉस्पिटल पुण्याला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.त्या पिल्लांचा संगोपन करून नैसर्गिक पर्यावरण सानिध्यात सोडण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी वन्यजीव बचाव पथक कोल्हापूरचे प्रमुख प्रदीप सुतार म्हणाले नागरिकांनी घाबरून जाऊ नये कोथळी येथे आज आठ ते नऊ दिवसाची दोन पिल्ले सापडले आहेत ती बिबट्याची नसून वाघाटी या जातीची रान मांजराची पिल्ले आहेत.

असे सांगून नागरिकांनी घाबरून जाऊ नये वाढत्या नागरीकरणामुळे वाघाटी ही जात अतिशय दुर्मिळ होत चाललेली आहे.यामुळे वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे त्याचा नागरिकांना धोका नाही.

Spread the love
error: Content is protected !!