धार्मिक ऐतिहासिक संस्कृती यांचे स्मरण आणि मौलिक ठेवा
शिरोळ : शशिकांत उर्फ सचिन पवार
शिरोळ एक ऐतिहासिक गाव म्हणून गावाकडे पाहिले जाते.कारण या गावाला ऐतिहासिक आणि धार्मिक पाऊलखुणा काही सबळ पुरावे येथे आपल्याला पाहायला मिळतात अशा या गावात बारा बलुतेदारांपैकी
“समस्त कोळी बांधव” सुद्धा येथे इतिहासाचे साक्षीदार म्हणून आपल्या पूर्वापार “वीर” गुगुळ अशा धार्मिक कार्यक्रमातून त्यांनी परंपरा जिवंत ठेवली आहे.
आणि आशा या परंपरेनुसार या कोळी समाजामध्ये “वीर “काढला जातो हा वीर म्हणजे धार्मिक देवादिकांच्या काळात म्हणजेच श्री म्हसोबा,श्री खंडोबा,श्री.नाईकबा,श्री.बहिरेश्वर श्री.नरसोबा आदी देवदेवतांचे शूर वीर सैनिक
तसेच प्राचीन काळी सिंघन राजवटीमध्ये घनघोर युद्धाचा प्रसंग होऊन यामध्ये बरेच सैनिक मृत्युमुखी पडलेले असावेत आणि हे आपले पूर्वज असल्यामुळे यांची आठवण म्हणून आजही आपल्या शिरोळ नगरीतील वास्तुकलेचा त्याचबरोबर शिल्पकलेचा उत्तम नमुना असणारे
शिवमंदिर म्हणजेच ग्रामदैवत” श्री कल्लेश्वर देवालय” या नावाने प्रसिद्ध आहे.कदाचित शिलाहार किंवा सिंघन राजांच्या कार्यकालामध्ये याची निर्मिती असावी असे जाणकारांचे मत आहे.आणि या मंदिराच्या बाहेरील बाजूस चिंचेच्या झाडाखाली आपल्याला किमान
तीन ते चार उंचीची मोठ्या दगडी शिळा किंवा दगडांमध्ये शिल्प कोरलेली पाहायला मिळतील यांना वीरगळ असे म्हटले जाते.वीरगळ म्हणजे युद्धामध्ये वीरमरण आल्यानंतर त्या सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन ते तीन किंवा चार फूट उंचीच्या उभट दगडावर त्याने
लढलेल्या युद्धप्रसंगाचे चित्रीकरण दगडावर नक्षीच्या स्वरूपात कोरून केलेले असते.वीर म्हणजे युद्धात लढणारा सैनिक जो अतिशय प्राणपणाने लढतो त्याचा कल्लू उभा करणे म्हणजे वीरकल्लू उभा करणे. त्याचाच शब्द वीरगळ असा झालेला आढळतो.अनेक वीरांच्या स्मृतींच्या या खुणा इतिहासाच्या मूक आणि मूळ साक्षीदारच असतात.
महाराष्ट्रात अनेक गावागावांतून असे वीरगळ पाहायला मिळतात. एखाद्या गावात वीरगळ असणे हे त्या गावाचे प्राचीनत्त्व अधोरेखित करणारे असते. भूतकाळात इथे समरप्रसंग घडला होता आणि कोणी वीर धारातीर्थी पडले होते आणि याच विजयाचे प्रतीक म्हणून शिरोळ नगरीच्या पूर्वेला आजही “विजया नगरी”
मंदिर किंवा ठिकाण आणि हे कोरीव शिल्प म्हणजेच दगडी “वीरगळ “याची मूकपणाने साक्ष आपल्याला देत आहेत.
आणि आपल्या कुलाचे संरक्षण करणारे आपल्याला मार्गदर्शन संकट मुक्त शुभ आशीर्वाद व शुभ कार्य सफल होण्यासाठी तसेच
या वीर लोकांना वंदन करण्यासाठी त्यांचे स्मरण करण्यासाठी त्यांच्या हातातील शस्त्रांची तहान भागवण्यासाठी इतर विविध समाजाबरोबर कोळी समाजात “वीर “काढण्याची प्रथा रूढी परंपरा आहे.
या” वीर” प्रकारामध्ये एक गोड्या नैवेद्याचा… दुसरा खाऱ्या नैवेद्याचा असे दोन प्रकारचे विर काढले जातात.हे “वीर”कुटुंबातील युवकांचे लग्न झाल्यावर तसेच दर वर्षी मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुद्धा “काढला जातो,
वीर”गोकुळ आणि कुलदेवतेचे स्मरण म्हणून अंबाबाईचा गोंधळ धार्मिक कार्यक्रम कुटुंबामध्ये घातले जातात.या “विराचे प्रतीक” किंवा याचे” टाक “म्हणून एक आकर्षक असा करारी अंगावर धावून येणारा असा भासणार लाकडी मुखवटा त्यावर मोठाले डोळे भारदस्त मिशा डोक्याला फेटा आणि चेहऱ्यावर युद्धाच्या
तयारीत असलेला लालभडक सूर्य पुंज असा प्रखर तेजाचे रंगाने रंगवलेला त्यामध्ये जिवंतपणा आणि आणि देवपण आले आहे असे वाटणारा आपल्या कुलदैवत आणि कुलस्वामिनीचे आपल्या कुळाचे संरक्षण करणारा अशी विश्वासहर्ता प्रस्थापित करणारा भक्तीला पावणारा हा “वीरा चा मुखवटा” अगदी विशिष्ट प्रकारच्या लाकडाचा असतो
आणि हा मुखवटा समाजातील पारंपरिक आणि पूर्वापार चालत आलेल्या कुटुंबातील मानकरी घराण्याकडे यांच्या घरी स्थापना केलेली असते समाजामध्ये वीर काढण्याचा कार्यक्रम असतो या वेळेला या देवाला आमंत्रण म्हणून श्रीफळ,पान,सुपारी विडा अक्षदा,उपरणे
आणि मानाचा फेटा… फुल्ल आहेर त्यांचे समोर ठेऊन देवाला घरी “कार्यसिद्धीसाठी “यायचे आवतन(आमंत्रण) दिले जाते याच प्रमाणे आदल्या दिवशी समाज बांधवांना ही आमंत्रण म्हणून पानसुपारीचा विडा दिला जातो.कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी पिपाणी,सनई व्हलर यांचे पुई,डबकच्या मंगल वाद्यात तसेच रणांगणातील
सैनिकांचे रक्त सळसळायला लावणाऱ्या असे रणवाद्य म्हणजेच हलगीच्या कडक आवाज आणि घुमके केताळ याच्या यांच्या निनादात घरी वाजत गाजत आणले जाते.घरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी या वीराचे पायावर पाणी फुल वगैरे घालून पाद्य पूजन होते.दही,भाताचे मुटके आणि लिंबू उतरून तू कापून परस्पर दिशांना
ओवाळून टाकून आणि हा “विरा”चां मुखवटा चेहऱ्यावर धारण केलेला आणि हातात तलवार घेतलेला. वीर घरामध्ये प्रवेश करून हा त्या कुटुंबाच्या देव्हाऱ्यावर विराजमान होतो.
आणि या” वीराच्या” समोरच पूर्वापार आणि पारंपारिक चालत आले रिती रिवाजानुसार
या कुलदेवतांचे पूर्वज सैनिकासाठी त्यांच्या हातातील शस्त्रांची रक्ताची तहान भागवण्यासाठी आपली कुलस्वामिनी अंबाबाई,कुलस्वामी श्री.नाईकबा,श्री खंडोबा, श्री म्हसोबा,श्री.नरसोबा,श्री बहिरेश्वर तसेच विजयाचे प्रतीक असणाऱ्या श्री विजया नगरी आदीं देवांना स्मरून कुटुंबासह या मंदिरामध्ये हजर राहून”
महा अभिषेक” घातला जातो तसेच तीन बोकड आणि एक पाठ(शेळी) या ठिकाणी बळी दिले जातात आणि या बळी दिलेल्या प्राण्यांना ओलांडून वीर खेळणारा मानकरी तोंडाला वीरा चा मुखवटा आणि हातात काठी घेऊन त्याला मिरवणुकीसाठी बाहेर आणले जाते.नंतर या वीराच्या बरोबर समाजातील सर्व समाज बांधव तरुण
मंडळी या वीराला प्रिय असणारे कनेरी च्या फुलांच्या माळा प्रत्येक जण आपापल्या गळ्यात घालतात. प्रत्येकाच्या हातात काठी आणि कपाळाला गुलालाचा टिळा लावला जातो.युद्धभूमी च्या रणांगणातील रणवाद्य म्हणून हलगी कडाडली जाते साथीला गुमखा आणि कैतळाच्या निनादात या मुखवटा धारण केलेल्या वीराला पायावर
पाणी,डोळ्याला लिंबू लावून मिरवणुकीला सुरुवात होते.समाजातील तरुण वृद्ध गणकरी या वीरा बरोबर युद्धातील लढाईच्या प्रसंग प्रमाणे काठीने खेळाला सुरुवात होते.हा खेळ खेळत असताना या वीराच्या पायामध्ये खारीक,खोबरे,लिंबू, सुपारी बदाम काही दक्षणा विडा ठेवला जाते.आणि या
वीरा बरोबर खेळ करीत करीत स्वतःचा बचाव करीत करीत या पायातील वस्तू,विडा एका हाताने आपल्या ताब्यात घेण्याचा हे समाजातील गणकरी मंडळी अतिशय सावध पवित्रा घेऊन खेळ करीत असतात अशा या रोमहर्षक प्रसंग पाहण्यासाठी सभोवताली गर्दी होत असते.
हा वीर म्हणजे एक प्रामाणिक योध्याचे पराक्रमी आणि धाडसी सैनिकाचे आणि आपल्या कुलाचे संरक्षण करणाऱ्या आदी पुरुषाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते.अशा या वीराची मिरवणूक गल्लीतून चौकात आणि चौकातून शिरोळ नगरीच्या मानाच्या ऐतिहासिक आशा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तक्ता मधील श्रीमंत महाराणी आणि स्वराज्य सौदामिनी ताराराणी साहेब महाराज यांच्या गादीला मानाचा मुजरा करून या तक्ता समोर वीराचे अनेक डाव खेळले जाऊन मगच या” वीरा “ची मिरवणूक घराकडे प्रस्थान करते.
मुखवटा घेणाऱ्या व्यक्तीचा अंगात एक-एक वेळ याचा संचार सुद्धा झालेला दिसून येत असतो.त्यामुळे ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात अशा वेळी या मुखवट्याला जे उपकरण वापरलेले असते.ते उपरणे त्या व्यक्तीच्या कंबरेला बांधून त्याला मागे ओढून सावरण्याचा प्रयत्न केला जात असतो.
मिरवणुकीतून या वीराची कार्यक्रम स्थळी किंवा यजमान यांचे घरी ज्यावेळी आगमन होते.त्यावेळी या “वीरा चा मुखवटा”या यजमान कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या चेहऱ्याला घातला जातो.त्याच्या हातामध्ये काठी दिली जाते.
घरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी पायावर पाणी घातले जाते डोळ्याला लिंबू लावला जातो. दही-भाताचे मुटके परस्पर दिशेला ओवाळून टाकली जातात लिंबू कापून उतरवले जातात.एकंदरीत पाद्य पूजा होते.लिंबू कापून टाकला जातो.आणि मग देव्हाऱ्यावर बसवले जाते.
यानंतर सर्वजण याचे दर्शन घेऊन आपल्या इच्छा आकांक्षा भक्ती याबद्दल अतिशय श्रद्धेने प्रार्थना करून गळ्यातील माळा आणि बोकडांच्या कापलेल्या मुंड्या या देवाच्या समोर ठेवल्या जातात तसेच या बोकडांच्या मटनातील काळीज बाजूला काढून ते भाजून त्याचा निवेद या वीराला दाखवला जातो.
दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमांमध्ये समाजातील सर्व लहान थोर वृद्ध माता-भगिनी हिरिरीने भाग घेऊन एक धार्मिक कार्य म्हणून श्रद्धेने सहभागी होत असतात संध्याकाळी या बळी दिलेल्या बोकडांच्या मटणाचा रस्सा ज्वारीच्या भाकरीचा आणि भाजलेल्या काळजाचां
या “वीराला”महानैवेद्य दाखवला जातो आणि प्रसाद म्हणून सर्वजण जेवणाचा बेत मोठ्या उस्फूर्तपणे उत्साहाने करतात
असा हा आपल्या ऐतिहासिक शिरोळनगरीतील इतिहासाचा थेट साक्षीदार असणारा ठेवा म्हणजेच” वीर”हा कोळी या समाज बांधवांचे श्रद्धेचा आणि भक्तीचा भाग तर आहेच
याचबरोबर कुलाची योद्धा परंपरा जतन केलेली दिसून येते.खरोखर हा सोहळा म्हणजे धार्मिक ऐतिहासिक संस्कृती यांचे स्मरण आणि मौलिक ठेवा आहे..!