बेळगाव जिल्ह्यातील कारखान्यानी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकरी संघटना आणि कारखान्यांच्या मध्ये झालेल्या निर्णयाप्रमाणे ऊसाला दर द्यावा
शिरोळ / प्रतिनिधी
कर्नाटकातील कारखाने कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमा वरती भागात असल्याने महाराष्ट्राच्या क्षेत्रातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात ऊस उचलत असतात चालू वर्षी सुद्धा कर्नाटकातील कारखान्यांची ऊसतोड यंत्रणा कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये आढळून येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकरी संघटना व कारखानदारांच्या मध्ये सन 2022-23 मध्ये आलेल्या उसास मागील फरक बिल 100 रुपये प्रति टन देण्याचे ठरले आहे व चालू हंगामाला अधिक 100 रुपये असे 3100 प्रति टन पहिले बिल देण्याचे ठरले आहे.
या निर्णयाचा विचार करून महाराष्ट्रातून येणाऱ्या उसास प्रति टन 3 हजार 100 वरील निर्णयाप्रमाणे दर जाहीर करावेत व तसा प्रस्ताव प्रसारित करून त्याची प्रत आम्हाला लेखी देण्यात यावी असे निवेदन
पी.बी.कोरे सहकारी साखर कारखाना नणदी,वेंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट बेडकीहाळ या कारखान्यांना देण्यात आले.यावर कारखाना प्रशासनाकडून दोन दिवसांमध्ये चर्चा करून निर्णय देण्यात येईल असे सांगण्यात आले.
तसे न झाल्यास वरील कारखान्यांच्या ऊस तोडी व वाहतूक बंद करण्यात येईल असा इशारा आंदोलन अंकुश संघटनेकडून देण्यात आला.यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील,अण्णासो वडगावे,बंडू पाटील,सुदीप पाटील,अरिहंत शिरहट्टी,विशाल पाटील आदी शेतकरी उपस्थित होते .