शिरोळ / प्रतिनिधी
शेतकऱ्यांची ऊस वजनात होणारी लूट रोखण्यासाठी १२ नोव्हेंबर पासून वजन काटा शेतकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध झाला आहे.यावर्षीचा हंगाम अजून गतीने सुरु झाला नसला तरी
गेल्या तीन दिवसात वेगवेगळ्या कारखाण्यांची जवळपास ३० हुन अधिक वाहने वजन करून गेलेली आहेत.शेतकरी वजन काटा आणि कारखाण्यांचा काटा यामधील तफावती बाबत आत्ताच जाहीर पणे बोलणे योग्य ठरणार नाही
पण हंगामाच्या मध्यावर आम्ही सविस्तर अहवाल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समोर ठेवणार आहोत.गुरुवारपासून काटा 24 तास सुरु ठेवणार आहोत तरी शेतकऱ्यांनी आपल्या उसाचे वजन आपल्या काट्यावर करून मगच कारखाण्याला ऊस पाठवावा असे आवाहन आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी केलं आहे.
आता हवाय वजनकाट्यासाठी मदतीचा हात
शेतकरी वजन काटा उभारणी झाली असली तरी आम्हाला अजून ४ लाख ७० हजार रुपयांची गरज आहे.काट्याचे १०% पेमेंट व हंगामा अगोदर काटा सुरु व्हावा म्हणून अन्य गोष्टी उधारीवर घेऊन आम्ही तातडीने काम पूर्ण केले आहे.
काट्याचे पेमेंट व उधारी घेतलेले लोक आंदोलन संपल्यामुळे ते आता मागे लागले आहेत.त्यांचा हिशोब भागवण्यासाठी आम्हाला पैश्याची गरज आहे तरी मदत देऊन सहकार्य करावे अशी सर्वाना विनंती आहे.
धनाजी चुडमुंगे – आंदोलन अंकुश संघटना