मुख्यमंत्री शिंदेनी शिवप्रतिष्ठांनचे संस्थापक संभाजीराव भिडे (गुरुजी) व अध्यक्ष रावसाहेब देसाई यांना दिले आश्वासन
शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ शहरात ऐतिहासिक असा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने लागेल ते मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे व राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांना दिले आहे.
शिरोळ शहरातील सर्व तरुण मंडळाच्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा समिती व ट्रस्टच्या अध्यक्षपदी रावसाहेब देसाई यांची एकमताने, सर्वानुमते निवड केल्यानंतर रावसाहेब देसाई यांनी दिलेला शब्द पाळला आहे.
शिवप्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या मोहिमेच्या प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या समारोप समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी शिरोळमध्ये अश्वारूढ पुतळा उभारणी संदर्भात रावसाहेब देसाई यांनी संभाजीराव भिडे यांच्या समवेत चर्चा केली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरोळमध्ये अश्वारूढ पुतळा उभा करण्यासाठी जे-जे म्हणून सहकार्य लागेल, ते-ते करण्यास स्वतः मी व राज्य शासन तयार असल्याचा शब्द दिला आहे.
तसेच या संदर्भात शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना या कामी लक्ष घालण्याची सूचना करत रावसाहेब देसाई यांच्याशी चर्चा करून तात्काळ शिरोळात अश्वारूढ पुतळा बसवण्यासाठी कारवाई करण्याचे शिंदे आणि सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वाधोड पुतळा उभारण्या संदर्भात झालेली ही चर्चा ऐतिहासिक शिरोळ व तरुणांसाठी महत्त्वाची ठरली आहे.छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती ताराराणी यांचा ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या शिरोळमध्ये उभा करण्यात येणाऱ्या अश्वारूढ पुतळ्यासाठी कसलीही अडचण येवून देणार नाही.
पुतळा उभारणीसाठी स्वतः लक्ष घालून, लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देणार, यात कुठेही कमी केली जाणार नाही. असे अभिवचन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे.पुतळा समितीचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत चर्चा करून पुतळा उभारणीचा मार्ग सोयीस्कर व सुखकारक केला आहे.
लोकसभेच्या निवडणुकीनंतर पुतळ्या संदर्भातील नियोजनाची संपूर्ण माहिती जनतेसमोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभा करण्यासाठी शहरातील तरुण मंडळाच्या तरुणांनी घेतलेला निर्णय घराघरात पोहोचला आहे.
त्यामुळे शहरातील प्रत्येक घराचे छत्रपतींच्या पुतळा उभारणीत योगदान राहणार आहे.शिव प्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष, रावसाहेब देसाई हे वेगवेगळ्या गड किल्ल्यावरील मोहीम, दौड,छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, माता जिजाऊ यांच्यावरील
अपारनिष्ठा जोपासत छत्रपतींचे कार्य घराघरात पोहोचवण्यामुळे देसाई यांना मानाचे स्थान आहे. त्यांची हीच ओळख छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीसाठी उपयुक्त ठरणार आहे