राष्ट्रीय कृषी उद्योजिका सौ कल्पना माळी इन्स्पायर आयडॉल पुरस्काराने सन्मानित

शिरोळ / प्रतिनिधी

 

येथील राष्ट्रीय कृषी उद्योजिका सौ कल्पना प्रवीण माळी यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याची दखल घेत भास्कर पब्लिकेशन न्यूज नेटवर्क यांच्यावतीने इन्स्पायर आयडॉल तथा प्रेरणा मूर्ती पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या पुरस्काराबद्दल सौ माळी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

शिरोळच्या स्नुषा सौ. कल्पना प्रविण माळी या गेली सहा वर्ष शेतीविषयक लागणारी उत्पादने तयार करणे व विक्री करणे या विषयी काम करतात. त्यांचे शिक्षण MSc (वनस्पती शास्त्र) व PGDBM या विषयात झाले असून त्या” ओयासिस अँग्रो इंडस्ट्रीज ” या नावाने कृषी क्षेत्रात कार्यरत असणारी संस्था चालवितात.

 

 

त्यांच्या संस्थेमध्ये शेतातील माती परीक्षण प्रयोगशाळा मित्र किडींचे उत्पादन प्रयोगशाळा. चिकट व लाईट सापळे तयार करणे. कामगंध सापळे तयार करणे बायोस्टूमिलंट तयार करणे.जीवाणू खते तयार करणे. जैविक किटकनाशके तयार करणे.विदेशी भाजीपाला करार शेती शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्था

 

 

चालविणे याविषयी काम करून कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांनी प्रगती साधावी यासाठी माफक दरात त्यांना सुविधा पुरवितात आतापर्यंत त्यांनी जवळपास २५ ते ३० हजार शेतकऱ्यांना मार्गदर्शन व उत्पादने पुरविले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या राज्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ झालेला आहे.

 

सौ कल्पना प्रविण माळी यांच्या नावे २ प्रोडक्टच्या पेटंट रजिस्ट्रेशनचे काम सध्या सुरू आहे. त्यांच्या प्रयोगशाळेत सध्या vertical farming चा नाविन्यपूर्ण उपक्रम देखील सुरु आहे. सध्या त्या जैवीक व विषमुक्त शेतीचा प्रचार व प्रसार करण्याचे काम करतात.

 

त्याने कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेवून कृषी मंत्रालय भारत सरकार, नाबार्ड व मॅनेज यांच्या वतीने “राष्ट्रीय कृषी उद्योजिका २०२१ हा पुरस्कार दिल्ली येथील कार्यक्रमात केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

 

 

तसेच यावर्षी भास्कर पब्लिकेशन न्यूज नेटवर्क यांनीही सौ कल्पना माळी यांच्या कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत इन्स्पायर आयडॉल तथा प्रेरणा मूर्ती पुरस्कार देऊन सन्मानित केले.

 

गोवामधील पणजी येथील दीनानाथ मंगेशकर कला अकादमी येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते पद्मश्री विनायक खेडेकर माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलफ गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत गोव्याचे कला व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांच्या उपस्थितीत सौ कल्पना प्रवीण माळी यांना मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

 

यावेळी उद्योजक प्रवीण माळी भास्कर पब्लिकेशन न्यूज नेटवर्कचे अध्यक्ष राजीव लोहार त्यांचे सर्व पदाधिकारी मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उल्लेखनीय कार्यासाठी सौ कल्पना माळी यांना त्यांचे पती प्रवीण माळी दीर उद्योजक सचिन माळी व त्यांच्या पत्नी प्रा सौ माधुरी माळी आई – वडील यांच्यासह माळी परिवाराचे मार्गदर्शन व प्रेरणा लाभत आहे.

Spread the love
error: Content is protected !!