इचलकरंजी / प्रतिनिधी
पुणे येथील केंब्रिज शिक्षण समूहाच्या वतीने पहिले राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन दिनांक 28 जानेवारी रोजी आंबेगाव पठार पुणे येथे आयोजित केले होते.या संमेलनामध्ये इचलकरंजी येथील डॉ. प्रतिभा पैलवान यांना आदर्श समाज गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
डॉ.प्रतिभा पैलवान यांच्या साहित्यिक,सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन त्यांचा विशेष सन्मान या संमेलनामध्ये करण्यात आला. या संमेलनाचे उद्घाटक सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत हे होते.तर संमेलनाचे अध्यक्ष साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक
नवनाथ गोरे हे होते.
केंब्रिज शिक्षण समूहाचे सर्वेसर्वा प्रा.डॉ.चंद्रकांत कुंजीर यांच्या मार्गदर्शनाखाली भरलेल्या युवा मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रक दशरथ यादव हे होते.तर संपूर्ण संयोजन प्रसिद्ध सूत्रसंचालक रानकवी जगदीश वनशिव यांनी केले होते.
डॉ.प्रतिभा पैलवान यांचा साहित्यिक प्रवास खरंच कौतुकास्पद आहे. कथा,कविता, दीपावली अंक,स्मरणिका अशा विविध प्रकारचे लेखन आजपर्यंत त्यांनी केले आहे.त्यांच्या लेखनाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.याशिवाय तृतीयपंथीयांसाठी करत असणाऱ्या कार्यासाठी त्यांना समाजाने पाठिंबा दिला पाहिजे.
विशेषतः त्या ज्यांच्यासाठी काम करतात त्यांनी पण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे,असे ते म्हणाले, या संमेलनामध्ये जवळजवळ 150 पेक्षा जास्त कवींनी आपला सहभाग नोंदवला होता.यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.