चर्मकार स्मशानभूमीत भानामतीच्या प्रकाराने खळबळ
शिरोळ / प्रतिनिधी
आयडेंटी साईज फोटो,लाल अक्षरांमध्ये नाव, लिंबू,दोरा इतर साहित्य शिरोळच्या चर्मकार स्मशानभूमीत एका पिंपळाच्या झाडाला बांधून अडकवलेले आढळल्याने स्मशानभूमीत पुन्हा भानामतीच्या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे.शिरोळच्या पूर्वेकडील पाच किलोमीटर अंतरावरील एका गावातील आयडेंटिटी फोटो व गावचे नाव असल्याने शहरात उलट सुलट चर्चा रंगली आहे.शिरोळ अर्जुनवाड रोड वरील असणाऱ्या चर्मकार समाज स्मशानभूमी बुधवारी सकाळी एका व्यक्तीचा आयडेंटिजेस फोटो त्यावर नाव, लिंबू दोरा असे सर्व साहित्य बांधून एका पिंपळाच्या झाडाला बांधून ठेवल्याचे पहाटे स्मशानभूमीची स्वच्छता करण्यासाठी आलेल्या नागरिकांना हा प्रकार लक्षात आला.या भानामतीचा प्रकाराने खळबळ उडाली आहे.दरम्यान असाच प्रकार शिरोळ पंचगंगा नदीवरील स्मशानभूमीत काही महिन्या पूर्वी घडला होता.त्यानंतर पुन्हा चर्मकार समाजाच्या स्मशानभूमीत या भानामतीच्या प्रकारामुळे शहरातील नागरिकांच्यातून संताप व्यक्त होत आहे.शिरोळ शहराच्या पूर्व बाजूला असणाऱ्या एका ग्रामीण खेडे गावातील व्यक्तीच्या फोटो ठेऊन हा अघोरी प्रकार करण्यात आला आहे.मात्र हा अघोरी प्रकार का? व कशासाठी? शिरोळ स्मशानभूमीतच का केला? या चर्चेने शहरात तर्कवितर्क लढवले जात आहे.
आशा अघोरी प्रकार करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा व स्मशानभूमी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत जेणेकरून या आघोरी प्रकाराला आळा बसेल अशी मागणी नागरिकातून होत आहे.या भानामतीचा प्रकाराने शिरोळ शहरासह तालुक्यात चर्चा रंगली आहे.