घोसरवाड / प्रतिनिधी
घोसरवाड ता.शिरोळ येथील सामाजिक कार्यकर्ते श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी.सा रे पाटील फाउंडेशन घोसरवाडचे अध्यक्ष व घोसरवाडच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष जितेंद्र उर्फ धोंडीलाल बाबू चाऊस यांची राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
धोंडिलाल चाऊस यांनी सामाजिक उपक्रमात सहभाग घेतात. कोरोना काळात त्यांनी अनेकांना मदत केली आहे. महापुरात त्यांनी अनेक कुटुंबांना अन्नधान्य वाटप केले आहे.जिल्हा परिषद शाळेतील मुलांना वह्या वाटप.गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान जानकी वृद्धाश्रम येथे धान्य वाटप तसेच त्यांनी नऊ वेळा रक्तदान केले आहे.
अब्दुललाट येथील बाल उद्यान अनाथ शाळेचे धान्य वाटप व नवे दानवाड येथील आश्रम शाळेला एलईडी टीव्ही व वह्या वाटप असे अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत.गॅस दर वाढी विरोधात आंदोलन कोरोना काळात सेनिटायझर वाटप साखर वाटप त्यांनी केले आहे.
समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून विविध घटकांना ते नेहमी मदत करीत असतात.या त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय श्री स्वामी विवेकानंद पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे.