ख्यातनाम कवी रामदास फुटाणे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
ग्रंथदिंडी,कथाकथन,कवी संमेलन यासह भरगच्च कार्यक्रम
शिरोळ / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष शिरोळ तालुक्याचे माजी आमदार व दत्त साखर कारखान्याचे संस्थापक दलितमित्र भाई दिनकररावजी यादव यांच्या २९ व्या स्मृति पित्यार्थ गुरुवारी १ फेब्रुवारी२०२४ रोजी शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीने साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून ख्यातनाम कवी वात्रटिकाकार रामदास फुटाणे उपस्थित राहणार आहेत.येथील श्री दत साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील स्वर्गीय दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळ सभागृहाच्या प्रांगणात साहित्य संमेलन होणार आहे.या संमेलनात ग्रंथ दिंडी,पुस्तक प्रकाशन, पुरस्कारवितरण, कथाकथन,निमंत्रितांचे कवी संमेलन व काव्य कट्टा असा भरगच्च कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुनील इनामदार व सचिव शंतनू यादव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.१ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ८.३० वाजता यादव बंगला ते संमेलन स्थळापर्यंत ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे या ग्रंथ दिंडीमध्ये शालेय विद्यार्थी,छात्र सैनिक,साहित्यिक,लेखक कवी यांच्यासह वारकरी मंडळी सहभागी होणार आहेत.या पहिल्या सत्रात संमेलनाचे उद्घाटन ख्यातनाम कवी रामदास फुटाणे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळूबुळू उपस्थित राहणार आहेत.दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.या संमेलनामध्ये दलितमित्र भाई दिनकररावजी यादव जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कार शिरोळची सुकन्या महिला महाराष्ट्र केसरी पै. अमृता पुजारी यांना प्रदान करण्यात येणार आहे.यावेळी डॉ.राजश्री पाटील यांचे आणि चांदने उन्हात हसले यासह विविध पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.इचलकरंजी येथील समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.दुसऱ्या सत्रात दुपारी २ वाजता बिळाशी येथील बाबासाहेब परीट व शिरोळ येथील डॉ.विजयराज कोळी यांचे कथाकथन होणार आहे.ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष बजरंग काळे (गुरुजी) कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता तिसन्या सत्रात डॉ. चंद्रकांत पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन होत असून नामांकित कविना निमंत्रित करण्यात आले आहे.सायंकाळी ५ वाजता शिरोळ तालुक्यातील नवोदित कवींसाठी काव्य कट्टा हा विशेष काव्य वाचनाचा कार्यक्रम असून अध्यक्षस्थान साहित्यीका सौ. विजया बन्ने भूषविणार आहेत. गुरुवारी १ फेब्रुवारी २०२४ रोजी दिवसभर सुक्त असलेल्या साहित्य संमेलनातील सांस्कृतिक मेजवानीचा लाभ घ्यावा असे आवाहन शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुनील इनामदार यांनी केले आहे. या पत्रकार बैठकीस शब्दगंध साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष डॉ दगडू माने, सचिव शंतनू यादव,पृथ्वीराजसिंह यादव, विराजसिंह यादव अविनाश उर्फ पांडुरंग माने, प्रा अनिल कुंभार,प्रा संजय पाटील बजरंग काळे भगवान कोळी,विठ्ठल भाट,पंडित काळे, गजानन संकपाळ,निळकंठ उर्फ पिंटू फल्ले,विजय आरगे, संजय चव्हाण,निनाद भोसले,संजय बांदिवडेकर, चंद्रकांत भाट,विनोद मुळीक,बबन पुजारी, अजित देशमुख,पंडित पुदें, प्रफुल कोळी,अवधूत संकपाळ,बाळासो कोळी यांच्यासह शब्दगंध साहित्य परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.