शिरोली येथे भूमीगत गटर्स आणि रस्ते कामाचा शुभारंभ
कुंभोज / प्रतिनिधी विनोद शिंगे
पुलाची शिरोली येथे १५ व्या वित्त आयोगाकडून ८ लाखाचा निधी उपलब्ध झाला.या निधी मधुन बंदीस्त भूमीगत गटर्स आणि रस्ते कामाचा शुभारंभ माजी आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला.
शिरोली पुलाची येथील ग्रामपंचायत समोरील पाटील घर ते यादव घर येथील गटरी चे काम ५४ वर्ष झाली रखडले होते.आज त्या कामाचा शुभारंभ झाला.त्यामध्ये अमल महाडिक आणि शौमिक महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू केले आहे.
तसेच शिरोली गावासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही महाडिक यांनी दिली.शिरोली स्वच्छ व सुंदर शिरोली करण्याच्या ध्येयाला आज पासून सुरवात झाली आहे.असे लोकनियुक्त सरपंच पद्मजा करपे यांनी सांगितले.
कामाची सुरुवात ग्रामपंचायत समोरील पाटील घर ते यादव घर,लंबे बोळ, खुपिरे बोळ वार्ड क्रमांक १ मधील कुटवाडे माळा,यासर्व ठिकाणी निधी मधून काम सुरू झाले आहे.अनेक वर्षे या भागात काम झाले नव्हते.
हा भाग दुर्गम आणि दुर्लक्षित होता.त्यामुळे योग्य ठिकाणी निधी वापरला गेला आहे असा विश्वास उपसरपंच अविनाश कोळी यांनी व्यक्त केला.यावेळी ग्राम विकास अधिकारी ए.वाय.कदम, वडगाव बाजार कमिटी सभापती सुरेश पाटील,
राजाराम साखर कारखान्याचे चेअरमन माजी दिलीप पाटील, माजी सरपंच विठ्ठल पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सर्व सदस्य,सदस्या,नागरिक उपस्थित होते.