कुंभोज येथे रस्त्यासाठी 25 /15 च्या निधीतून रस्ते कामाचा शुभारंभ
कुंभोज / प्रतिनिधी विनोद शिंगे
कुंभोज परिसरातील शेती सुधारायची असेल तर परिसरातील रस्ते चांगले असले पाहिजे त्यासाठी महाडिक परिवार सतत प्रयत्नशील असून कुंभोज येथील सुतार वस्ती ते वाठार रस्त्यासाठी 25 /15 च्या निधीतून
माजी आमदार अमल महाडिक दहा लाख रुपयाच्या रस्त्या कामाचा शुभारंभ छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच स्वीकृत संचालक अमित साजनकर यांच्या हस्ते करण्यात आला.कुंभोज परिसरात छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याला मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक केली जाते,
अनेक रस्ते खराब असून त्या रस्ते करण्याची जबाबदारी छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यात बरोबरच आपली असल्याचे मत यावेळी दूरध्वनीवरून माजी आमदार अमल महाडिक यांनी बोलताना व्यक्त केले.कुंभोज परिसरातील अन्य पाणंद रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात फंड देण्यात येणार असल्याची माहिती
यावेळी आमदार अमल महाडिक यांनी फोनवरून दिली यावेळी. एडवोकेट अमित साजणकर यांनी माजी आमदार अमल महाडिक यांनी मोठ्या प्रमाणात कुंभोजसाठी फंड उपलब्ध करून दिल्याबद्दल कुंभोज परिसराच्या वतीने त्यांचे आभार मानले. यावेळी माजी उपसरपंच अण्णासाहेब आरगे, ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब
पाटील,बबन आरगे,रविराज जाधव,अण्णासाहेब शिंद,गफुर सुतार,छत्रपती राजाराम कारखाना संचालक सुरेश तानगे,सदाशिव कुंडले तसेच कारखान्याचे सर्व सभासद व रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर दीपक जाधव उपस्थित होते.