‘हा’ पुल झाला तर अनेक गावांना होणार मोठा फायदा

अब्दुललाट-टाकवडे पुलाची होतेय मागणी

अब्दुल लाट (ता-शिरोळ) येथील पंचगंगा नदीवर लाट- टाकवडे पुलाची गरज आहे.या पुलाची अनेक वर्षांपासून मागणी होत असून अब्दुल लाट येथे सद्या प.पू.आण्णा महाराज दत्त मंदिर ते पंचगंगा नदीपर्यतचा अतिशय

रुंद व डांबरीचा रस्ता तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील (यड्रावकर) याच्या विशेष प्रयत्नातून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जात आहे.यामुळे याबरोबरच अब्दुल लाट-टाकवडे पूल व्हावे यासाठीही ग्रामस्थांमधून मागणीचा जोर वाढत आहे.

अब्दुल लाट-टाकवडे पुलाची मागणी अनेक वर्षांपासून आहे.अब्दुल लाट,शिरढोण, टाकवडे,नांदनी ही मोठ्या लोकसंख्येची गावे असून नदीपलीकडील गावात,शहरात व कर्नाटकात जाण्यासाठी इचलकरंजी,कुरुंदवाड मार्गे वळसा घालून जावे लागते.

तसेच शेतकऱ्यांना,व्यावसायिकांना देखील मोठ्या शहरातील बाजारपेठेत आपला भाजीपाला व इतर माल विकण्यास अडचणीची व आर्थिक जोखमीचे ठरते.या पुलामुळे नागरिकांना, शेतकऱ्यांना,व्यावसायिकांना,साखर कारखान्यांना शाळा -महाविद्यालयतील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

तसेच या परिसरात रोजगाराला देखील चालना मिळणार आहे.जवळचा वाहतुकीचा रस्ता निर्माण झाल्याने दळणवळणासाठी लागणाऱ्या वेळेची व पैशाची मोठी बचत होणार आहे.तर शेतकरी व व्यावसायिकांना कर्नाटक व महाराष्ट्रातील नजीकचे बाजारपेठ उपलब्ध होऊन रोजगार

निर्मिती,पर्यटन वाढणार आहे, या पुलामुळे जयसिंगपूर लाट,लाटवडी, शिरढोण, घोसरवाड,नांदणी, दत्तवाड या व येथील परिसरातील अनेक गावांना याचा मोठा थेट फायदा होऊन येथील विकासाला चालना मिळणार आहे.

चौकट –
अब्दुल लाट – टाकवडे पुलाची अनेक वर्षांपासून ग्रामस्थांची मागणी आहे व ती पूर्ण व्हायला हवी. सद्या गावापासून ते नदीपर्यंतचा चांगला व रुंद रस्ता तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांच्या विषेश प्रयत्नातून होत आहे.

या रस्त्याचा फायदा येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.त्याचबरोबर येथे पुल झाल्यास येथील हजारो हेक्टरातील शेतकऱ्यांना,व्यावसायिक,साखर कारखाना विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.व यामुळे या परिसरात उद्योग- व्यवसाय,कृषी उत्पन्न, रोजगार,दळणवळण व पर्यटन वाढून प्रत्यक्षपणे अनके गावांचा विकास होणार आहे.

शेतकरी व ग्रामस्थांच्या या मागणीचा विचार करून या पुलाचे काम लवकर चालू होण्यासाठी आमदार,खासदार तसेच संबधीत विभागाकडे मागणी व प्रयत्न करणार आहे.

सौ.वर्षा पाटील –
विद्यमान ग्रामपंचायत सदस्या अ.लाट

Spread the love
error: Content is protected !!