शिरोळकरांचे आशीर्वाद व पाठबळामुळेच मिळाले यश – पै अमृता पुजारी

शिरोळकरांचे आशीर्वाद व पाठबळामुळेच मिळाले यश : पै अमृता पुजारी

शिरोळ नगरपरिषद व नागरिकांच्या वतीने नागरी सत्कार

शिरोळ /  प्रतिनिधी शिरोळकरांनी दिलेले आशीर्वाद व पाठबाळाच्या जोरावरच महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत महिला केसरी किताब पटकाविता आला असेच सदैव आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावेत इथून पुढेही कुस्ती स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही महिला महाराष्ट्र केसरी पै अमृता पुजारी हिने दिली.

 

चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धेत शिरोळची सुकन्या पै.अमृता पुजारी हिने महाराष्ट्र महिला केसरी किताब पटकावल्याबद्दल शिरोळ नगरपरिषद व नागरिकांच्यावतीने येथील शिवाजी चौकात नागरी सत्कार करण्यात आला.यावेळी पै.अमृता पुजारी बोलत होती.तत्पूर्वी शिरोळमधील धनगर समाजाच्या वतीने ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज मंदिरापासून धनगरी ढोल,हलगी, तुतारी या पारंपारिक वाद्याच्या निनादात आणि फटाक्याची आतिषबाजी करत जीपमधून पै.अमृता पुजारी व तिचे प्रशिक्षक दादासो लवटे यांची मिरवणूक काढण्यात आली.

 

मिरवणुकी दरम्यान ठीक ठिकाणी पै.अमृता पुजारी हिचे स्वागत करण्यात आले.मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या हस्ते माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव, दलितमित्र डॉ अशोकराव माने, दत्तचे संचालक दरगू गावडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पै अमृता पुजारी हीला मानपत्र चांदीची गदा रोख ५१ हजार रुपये,तीन वर्षाचा प्रतिवर्षी १० लाख रुपयाचा विमा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन नागरी सत्कार करण्यात आला.

 

तसेच प्रशिक्षक दादासो लवटे सहाय्यक प्रशिक्षक दयानंद खेतकर सागर देसाई यांचाही गौरव करण्यात आला.पै.शिवाजीराव मरळे यांनी पै. अमृता पुजारी हिचा चांदीचे कडे देऊन सत्कार केला. माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,युवानेते पृथ्वीराजसिंह यादव,राजर्षी शाहूनगर वाचन मंदिर समस्त धनगर समाज शिरोळ तालुका कुस्तीगर परिषद दलितमित्र डॉ. अशोकराव माने, भाजपाचे तालुका अध्यक्ष मुकुंद उर्फ बाळासो गावडे,भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अरविंद माने,नरेंद्र माने,श्री राम मंदिर उत्सव समिती व वारकरी सांप्रदाय वाघजाई युवा मंच यांच्यासह विविध मंडळ सहकारी संस्था विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पै.अमृता पुजारी हिचा सत्कार केला.

 

पै.अमृता पुजारी हिचे प्रशिक्षक दादासो लवटे म्हणाले की पै.अमृता पुजारीच्या यशामागे तिच्या कुटुंबाबरोबरच शिरोळकर नागरिकांचे सहकार्य व आशीर्वाद नेहमीच लाभले आहे.ती यशस्वी व्हावी यासाठी प्रत्येकाने तिच्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.तिच्या पुढील वाटचालीसाठी अनेकांनी आर्थिक मदत केली आहे.असेच आशीर्वाद आणि प्रोत्साहन पै.अमृता पुजारी हिला लाभावे पुढच्या काळात आणखीन मोठे यश ती मिळवून शिरोळचे नाव मोठे करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव म्हणाले की पै.अमृता पुजारी हिने महिला महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्यानंतर शिरोळ शहरात दिवाळी साजरी झाली अनेकांनी तिचे अभिनंदन केले. यामुळे अमृताच्या यशाचा आदर्श येथील खेळाडू घेऊन तेही यशस्वी होऊन आपल्या शहराचा नावलौकिक करतील असे सांगून उपस्थितांचे आभार मानले.
स्वागत व प्रास्ताविक तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष अविनाश उर्फ पांडुरंग माने यांनी केले.मानपत्राचे वाचन पत्रकार डॉ दगडू माने यांनी केले.सूत्रसंचालन वाचनालयाच्या संचालिका सौ जयश्री पाटील यांनी केले.

 

 

या सत्कार सोहळ्यास माजी सरपंच गजानन संकपाळ, शिवाजीराव माने- देशमुख, माजी नगरसेवक पंडित काळे, योगेश पुजारी, तातोबा पाटील,राजेंद्र माने,पै प्रकाश गावडे रावसाहेब पाटील-मलिकवाडे,आण्णासाहेब गावडे,एन वाय जाधव, दयानंद जाधव,विजय आरगे,उद्योजक सचिन माळी,चंद्रकांत गावडे,बबन बन्ने,शशिकांत पुजारी,

 

दिलिपराव माने,धनाजीराव पाटील-नरदेकर,विठ्ठल पाटील , निळकंठ उर्फ पिंटू फल्ले,डॉ आप्पासाहेब पुजारी मज्जीद आत्तार,धनाजीराव जाधव, बजरंग वंटे,देवाप्पा पुजारी,शिवाजी पुजारी,बबन पुजारी,भिमराव पुजारी बाळासो कोळी,चंद्रकांत महात्मे,विठ्ठल भाट,बापूसो गंगधर,किसन भाट, ज्ञानदेव माने, आनंदा माने,

 

संभाजी चव्हाण, नंदू सुतार, बबन बन्ने, शाहू वाचनालयाचे सर्व संचालक विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर यांच्यासह शिरोळकर नागरिक धनगर समाज बांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!