शिरोळ येथे राजर्षी शाहू व्याख्यानमालेस प्रारंभ

शिरोळ येथे राजर्षी शाहू व्याख्यानमालेस प्रारंभ

राणी पाटील यांचे व्याख्यान ; विजय जाधव यांच्या कथाकथन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरोळ / प्रतिनिधी

ग्रंथालय चळवळीत शतकोत्तर दिशेने वाटचाल करणाऱ्या येथील राजर्षी शाहू नगर वाचन मंदिराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राजर्षी शाहू व्याख्यानमालेस प्रारंभ झाला.सलग चार दिवस सुरू असलेल्या व्याख्यानमालेस श्रोत्यांमधून चांगला प्रतिसाद मिळत असून शुक्रवारी २६ जानेवारी पर्यंत ही व्याख्यानमाला सुरू राहणार आहे.

 

येथील छत्रपती शिवाजी चौकातील पटांगणात
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा इंद्रायणी माने – पाटील यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले.शिरोळ पंचायत समितीच्या माजी सदस्या अनिता माने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.यावेळी राणी पाटील ( भुये ) यांनी ‘आजच्या युगात स्त्रियांची भूमिका ‘ या विषयावर व्याख्यान दिले . महिलांना मिळणारे हक्क , अधिकार आणि सक्षमीकरणातून कर्तबगार महिलांना सन्मान याविषयी त्यांनी प्रबोधन केले.या व्याख्यानास चांगला प्रतिसाद दिला.यावेळी सामाजिक कार्यकर्त्या देविका मोरे , डॉ सारिका माने ,कल्पना काळे , प्राजक्ता गोंदकर , वेदांतिका पाटील ,अन्नपूर्णा कोळी यांच्यासह महिला उपस्थित होत्या.दुसऱ्या दिवशीच्या सत्रात भरत अर्बन बँकेचे संचालक श्रेयश लडगे यांनी कथाकथन कार्यक्रमाचे उद्घाटन केले . धन्वंतरी पतसंस्थेचे चेअरमन महेश गावडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी सांगली जिल्ह्यातील ब्रह्मानंदनगर येथील प्रसिद्ध कथाकार विजय धोंडीराम जाधव यांनी नवरा आणि थैमान अशा दोन कथा सादर केल्या.या कथांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

 

यावेळी युवा उद्योजक अभिजीत माने , उद्योगपती दयानंद जाधव , अमोल देशमुख ,भरत बँकेचे संचालक धनंजय मुळीक उपस्थित होते. राजर्षी शाहू नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष प्रा अण्णासाहेब गावडे यांनी स्वागत करून संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. प्रा चंद्रकांत गावडे यांनी आभार मानले.जयश्री पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Spread the love
error: Content is protected !!