शिरोळात इंजिनिअर्स अँड आर्किटेक्टस् असोसिएशनचे मार्गदर्शन चर्चासत्र
शिरोळ / प्रतिनिधी
इंजिनिअर्स आणि आर्किटेक्टस् यांनी सकारात्मक विचार करून वर्तमान व भविष्य या दोन्हीच्या गरजा लक्षात घेऊन निसर्गाला संरक्षण देणारे शाश्वत बांधकाम उभा करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन इचलकरंजी येथील प्रसिद्ध आर्किटेक्ट शिवप्रसाद ओझा यांनी केले.शिरोळ इंजिनिअर्स अँड आर्किटेक्टस् असोसिएशनच्या वतीने मार्गदर्शन चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी टिकाऊ व भविष्याचा वेध घेणारे वास्तुशास्त्र या विषयावर शिवप्रसाद ओझा यांचे मार्गदर्शन झाले असोसिएशनचे अध्यक्ष नितीन शेट्टी यांनी स्वागत केले. रणजीत माने यांनी प्रास्ताविक केले.इंजिनिअर धनंजय मुळीक व श्रेयस लडगे यांची भरत अर्बन बँकेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी ओझा पुढे म्हणाले की एखादे काम सुरू करत असताना सदर कामात मालकाची असणारी गरज समजून घेणे आवश्यक आहे तसेच काम करण्यात येणाऱ्या त्या जागेची पाहणी करून जागेच्या भौगोलिक परिस्थितीनुसार बांधकामाचा आराखडा तयार करावा वर्तमान व भविष्यात बदलणाऱ्या परिस्थितीचा विचार करून निसर्गाचे संरक्षण कसे करता येईल याकडे लक्ष देऊन शाश्वत आणि रचनात्मक वास्तू उभा कराव्यात यासाठी आपला नेहमी सकारात्मक दृष्टिकोन असावा असे सांगितले.आयकॉन स्टीलचे टेक्निकल हेड अमोल नाईक यांनी स्टील संदर्भात माहिती दिली.यावेळी मार्केटिंग प्रतिनिधी विजय पाटील, तुषार पाटील,आयकॉन स्टीलचे विक्रेते आनंदराव माने – देशमुख,इंजिनिअर्स अँड आर्किटेक्टस् असोसिएशनचे उपाध्यक्ष सुजित पाटील, खजिनदार लक्ष्मण भोसले, रामप्रसाद पाटील, बाळासाहेब शेट्टी,अजय पाटील,वैभव माने,विनोद मुळीक, सुमित देसाई, वैभव काळे, दादासो माने – देशमुख, विवेकानंद मुळीक,गणेश चुडमुंगे,शुभम शेट्टी,नितीन पाटील,अक्षय पाटील, विनायक बनके,अभिजीत माळी, शुभम नाईक,अनिरुद्ध कांबळे,आकाश फल्ले,अजिंक्य भोसले, रोहित माळकर, वैभव शिंदे,रणजीत पाटील, संतोष कोल्हापुरे, सुमित शेट्टी,ओंकार कदम,गणेश आरगे,अजिंक्य पाटील, प्रथमेश पाटील, नितीन माने, बापू कांबळे, सुशांत माने, सागर पाटील,संकेत परीट,विनायक पाटील, अक्षय संकपाळ, दादासो काळे, निलेश पाटील यांच्यासह परिसरातील इंजिनिअर्स व आर्किटेक्टस् मोठ्या संख्येने उपस्थित होते. असोसिएशनचे सचिव स्वप्निल ढेरे – देसाई यांनी आभार मानले.