शिरोळ / प्रतिनिधी
विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ आगभाग शिरोळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती व इयत्ता आठवीच्या वर्गाची पालक सभा उत्साहात संपन्न झाल
शिक्षण संस्थेचे सचिव मेजर के.एम् भोसले,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सौ.सुवर्णा साळोखे,माया पाटील,रूपाली सूर्यवंशी,हारूण चिकोडे,सोनाली शिंदे, पालक प्रतिनिधी प्रकाश वरक,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत गाऊन करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाच्या शिक्षिका जयश्री पाटील यांनी केले.उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.इयत्ता आठवीचे वर्ग शिक्षक नितिन बागुल यांनी प्रथम सत्र परीक्षेच्या निकालाचे वाचत केले . त्याचबरोबर अध्ययन प्रक्रियेचे मूल्यमापन पाचवी व आठवीमध्ये झालेला बदल,विद्यार्थ्यांनमध्ये कौशल्ये विकसित होणे गरजेचे आहे.प्रत्येक मुल गतीने शिकू शकते.याविषयी पालकांना सविस्तर माहिती देण्यात आली.उपस्थित पालक व शिक्षक यांच्यामध्ये आंतरक्रिया तथा संवादात्मक चर्चा घडून आली.संस्थेचे सचिव मेजर के.एम.भोसले यांनी आपल्या मनोगतातून पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आपली मानसिकता बदलायला हवी, विचारांची दिशा बदलली पाहिजे.आत्मनिर्भर विद्यार्थी तयार झाला पाहिजे याविषयी माहिती दिली.आभार प्रदर्शन विद्यालयाचे शिक्षक श्रीकांत कोळ यांनी केले . वंदे मातरम् गाऊन सभेची सांगता झाली .सुत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक नितिन बागुल यांनी केले.