मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील नवी मुंबईत दाखल होणार आहेत.या पार्श्वभूमीवर आज नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत बैठक आयोजित केली होती.बाजार समिती अंतर्गत धान्य मार्केट,मसाला मार्केट, कांदा – बटाटा मार्केट आणि २८९ गाळ्यांचे मार्केट बंद करण्यात येतील.लोकांना वापरण्यासाठी योग्य असणारी ठिकाणे स्वच्छ करण्यात येणार आहेत.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व वाहने बाहेर काढून त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था,सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक बाजार समिती आणि पोलीस प्रशासन यांच्या मदतीने योग्य पद्धतीने वाहतूक व्यवस्था तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणारे सर्व रस्ते,गाळे स्वच्छ धुवून त्याठिकाणी मराठा आंदोलकांची गैरसोय होणार नाही ह्याची जबाबदारी घेण्यास सूचना केल्या.एपीएमसी मार्केट मध्ये येणारे बहुतांशी रोड ब्लॉक करून गर्दी टाळता येईल ह्या हिशोबाने वाहतूक यंत्रणा बंद करण्यात येईल.येणाऱ्या गाड्यांसाठी पार्किंग तसेच बाहेरचे रस्ते ब्लॉक करून वाहतुक सुव्यवस्था करण्याच्या सूचना केल्या.