कुंभोज येथील धुळखात पडलेल्या नूतन आरोग्य केंद्राच्या इमारतीस आरोग्य अधिकारी यांची भेट
कुंभोज / विनोद शिंगे
कुंभोज तालुका हातकलंगले येथे छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे गेल्या दोन वर्षापासून बांधकामाच्या व उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुंभोज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीस आज हातकणगले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दातार यांनी भेट दिली.या सदर कामाची पाहणी करून सदर कामाच्या ठेकेदारांना मार्च महिन्यापूर्वी सदर काम पूर्ण करून सदर इमारत लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येईल अशी आश्वासन दिले.परिणामी कुंभोज आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या प्रश्न राजकीय घडामोडी व मातबरांच्या मनधरणीमुळे रखडले असून सदर कामाच्या उद्घाटनाकडे कुंभोज ग्रामस्थांचे लक्ष वेधले आहे. परिणामी सदर इमारतीचा वापर सध्या अनेक वाईट गोष्टीसाठी केला जात असून,सदर इमारतीचा परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून,ही मरत म्हणजे दारू विक्रीच्या अडा पेनार्यांचे विश्रांती स्थान ठरले आहे. अनेक नागरिकांनी सदर इमारतीच्या खिडकीच्या काचा व दरवाजे फोडल्याचे चित्र दिसत आहे.कोट्यावधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या इमारतीचा होणारा गैरवापर आकडे शासन व लोकप्रतिनिधींचे का दुर्लक्ष आहे.असा सवाल सर्वसामान्य नागरिकात सध्या निर्माण होत असून गेल्या दोन वर्षापासून केवळ राजकीय स्वार्थासाठी सदर इमारतीचे उद्घाटन तटले आहे का?
याचीही चर्चा सध्या कुंभोसह परिसरात जोर धरत असून,कोरोना सारख्या कालावधीमध्ये सदर इमारत तयार असून सुद्धा तिचा वापर सर्वसामान्य नागरिकांना करता आला नाही याची चर्चा सध्या जोर धरत आहे.परिस्थिती पाहता शासन पातळीवर सदर इमारतीचे बांधकाम व फर्निचर तयार झाल्यानंतर सदर इमारतीचे उद्घाटन तात्काळ केली जाईल असा अंदाज शासकीय यंत्रणेतून व्यक्त केला जात आहे.