हातभट्टीची दारू दुचाकीवरून वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

कुरुंदवाड / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील दानोळी येथून एकजण हातभट्टीची दारू दुचाकी वाहनावरून वाहतूक करीत,दत्तवाड येथे विनापरवाना विक्रीसाठी आणत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसांनी हातभट्टी दारू आणि दुचाकी असा 75 हजाराच्या मुद्देमालासह दोघांना ताब्यात घेतले त्याच्याकडून तीस लिटर हातभट्टीची दारू सापडली आहे.सोज्वल उत्तम धांदले (वय.19,रा. शांतीनगर स्टॉप,दानोळी ता. शिरोळ),सागर आण्णाप्पा कोळी(वय 38 रा. दत्तनगर, दत्तवाड ता. शिरोळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,दानोळी येथून सोज्वल धांदले हा आपल्या ताब्यातील हिरो स्प्लेंडर मोटरसायकल क्र (एम.एच.09डी.एस 1360) वरून दत्तवाड येथील पेट्रोल पंपालगत हातभट्टी दारू अड्ड्यावर 100 लिटर गावठी हातभट्टी दारूच्या पाकिटाचे पोते देण्यासाठी आला असता राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक एस.बी.सिद,बी.एल.पाटील, अजित बोंगाळे,सागर नागटीळे,संदीप माने, शिवलिंग कंठे,वैभव शिंदे यांनी छापा टाकला असता दारू देणारा धांदले आणि अड्डाचालक कोळी रंगेहात मिळून आले.या कारवाईत हातभट्टी दारू आणि मोटर सायकल असा 75 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Spread the love
error: Content is protected !!