निपाणी / प्रतिनिधी
पन्नासवर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पतंगवीरांचा समावेश असलेल्या निपाणी आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाला नांगनूर निपाणी येथील जोल्ले शिक्षण संकुलाच्या भव्य मैदानावर उत्साहात सुरवात झाली. प्रारंभी जोल्ले ग्रुपचे उपाध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले यांनी जोल्ले ग्रुपच्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि या पतंग महोत्सवाचे महत्व सांगितले.याप्रसंगी इंडियन काइट फ्लायर्स चे सचिव संदेश कद्दी यांनी सर्व सहभागी फ्लायर्सचा परिचय करून दिला आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते विविध रंगाचे फुगे आणि पतंग आकाशात सोडून महोत्सवाला प्रारंभ झाला.यावेळी हालशुगर चे उपाध्यक्ष पवन पाटील, संचालक जयवंत भाटले, राजू गुंदेशा, भाजप शहर अध्यक्ष प्रणव मानवी, बाळासाहेब जोरापुरे, शिवराज जोल्ले, दादाराजे सरकार, बंडा घोरपडे , समित सासने, प्रसाद औंधकर, प्रशांत केस्ते उपस्थित होते.
जोल्ले ग्रुपचे इव्हेंट डायरेक्टर विजय राऊत यांनी सूत्रसंचालन केले.उद्या 24 तारखेला सकाळी 10 वाजता चिकोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले , बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील आणि निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले उपस्थित होते.