अश्वरूढ पुतळा समिती व ट्रस्टच्या अध्यक्षपदी रावसाहेब देसाई उपाध्यक्षपदी पृथ्वीराजसिंह यादव यांची निवड

शिरोळच्या छ.शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा समिती व ट्रस्टच्या अध्यक्षपदी रावसाहेब देसाई उपाध्यक्षपदी पृथ्वीराजसिंह यादव यांची निवड

दि.२८ रोजी पुतळ्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत करणार चर्चा : रावसाहेब देसाई

शिरोळ /  प्रतिनिधी

ऐतिहासिक शिरोळ शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्याकरिता गठित करण्यात येणाऱ्या समिती व ट्रस्टच्या अध्यक्षपदी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांची व उपाध्यक्षपदी युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांची निवड करण्यात आली आहे शिवप्रतिष्ठांच्या वतीने आयोजित केलेल्या गडकोट मोहीम सांगता समारंभास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत यावेळी त्यांच्यासोबत शिरोळमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्या संदर्भात चर्चा करणार असल्याची ग्वाही रावसाहेब देसाई यांनी दिली.शिरोळ शहरातील तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सोमवारी शिवाजी चौकातील शिवाजी तक्त येथे बैठक आयोजित केली होती या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठी समिती व ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून शिवप्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांची एकमताने हात वर करून निवड केली. तर युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांची सर्वानुमते उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.बोलवलेल्या बैठकीला शहरातील विविध तरुण मंडळाच्या सदस्यांनी उपस्थिती दर्शवली होती या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणे लोकवर्गणी गोळा करणे यासाठी लवकरच समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.बैठकीत कोल्हापूरचे जन्मजेयराजे घारगे देसाई यांनी शिरोळच्या अश्वरूढ उभारण्यासाठी पाच लाख रुपयांची देणगी आणि राहुल यादव यांनी स्व. दिनकरराव यादव यांच्या कुटुंबाकडून एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली.पुतळा समिती अध्यक्ष पदावरून गेली अनेक दिवस तरुणांमध्ये उत्साह आणि चर्चा होती सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये शहरातील तरुण मंडळाच्या युवकांनी समिती व ट्रस्ट अध्यक्ष पदासाठी रावसाहेब देसाई हीच व्यक्ती योग्य असून त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याचे आवाहन केले. आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते राकेश जगदाळे यांनी याबाबत भूमिका मांडली. सर्व तरुणांनी टाळ्यांच्या गजरात, हातवर करून जय शिवाजी, जय भवानी अशा घोषणा देत रावसाहेब देसाई यांच्या नावाला एकमताने सहमती दर्शवली.निवडीनंतर पुतळा समिती व ट्रस्टचे नवनिर्वाचित अध्यक्ष रावसाहेब देसाई म्हणाले, मला दिलेले अध्यक्ष पद म्हणजे गावाला दिलेले अध्यक्ष पद आहे. सर्वांना सोबत घेऊन पुतळा उभा करण्याची काम यशस्वी करूया. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण आणि पुतळा समितीच्या ठिकाणी पुतळा समिती अशा पद्धतीने वाटचाल करूया.शिरोळचा तरुण कार्यक्षम आहे, मला कोणतीही अपेक्षा नाही, नव्हती आणि नसणार आहे. दि. २८ रोजी शिवप्रतिष्ठान आयोजित गडकोट मोहिमेच्या समारोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत, या ठिकाणी पुतळा संदर्भातील विषय शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींना घेऊन निकाली काढणार आहे.शिरोळच्या तरुणांनी माझ्यावर जो अपार विश्वास दाखवला, ती जबाबदारी मी ताकतीने पार पाडणार, शिरोळ गाव हे पवित्र आणि पवित्र्य जपणारे आहे. बैठकीत आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, बंटी उर्फ यशवंत देसाई, नगरसेवक पंडित काळे, सामाजिक कार्यकर्ते शक्तीजीत गुरव, नगरसेवक श्रीवर्धन माने देशमुख यांनी बैठकीत समन्वय साधण्याचा सातत्याने प्रयत्न ठेवला.ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष बजरंग काळे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष देसाई यांचा सत्कार केला. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या तरुणांच्या बरोबर शिरोळ नगरपरिषदेच्या सत्ताधारी व विरोधी गटाचे माजी नगरसेवक आजी माझी लोकप्रतिनिधी विविध संस्थांचे पदाधिकारी तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!