वृत्तपत्र क्षेत्राच्या प्रगतीमधील वृत्तपत्र विक्रेता अविभाज्य घटक : अमरसिंह पाटील
शिरोळ तालुका वृत्तपत्र विक्रेता व एजंट संघाचा वर्धापन दिन उत्साहत
शिरोळ / प्रतिनिधी
सर्वच वृत्तपत्र क्षेत्राच्या प्रगतीसाठी वृत्तपत्र विक्रेत्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत त्यामुळे तो या क्षेत्राचा अविभाज्य घटक आहे त्य वृत्तपत्र विक्रेता व एजंटांच्या काही समस्या व अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी सरकारी दरबारी न्याय मागण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करू असे आश्वासन शिरोळचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी दिले.येथील हरी मंदिर येथे शिरोळ तालुका वृत्तपत्र विक्रेता व एजंट संघाचा १४ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला.यावेळी ते बोलत होते माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील शिरोळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद पुजारी शिरोळ शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष डी आर पाटील खजिनदार चंद्रकांत भाट पत्रकार दर्शन वडेर अविनाश सूर्यवंशी खंडेराव हेरवाडे प्रा सुभाष माळी यांच्या हस्ते माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम व आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सर्व वृत्तपत्र विक्रेते व एजंटांचा ४७२ रुपयांमध्ये ३० लाखाचा इन्शुरन्स विमा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.शिरोळ तालुका वृत्तपत्र विक्रेता व एजंट संघाचे अध्यक्ष रायबा माळी यांनी स्वागत केले सचिव धनाजी सावंत यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये वृत्तपत्र विक्रेते व एजंट यांच्या समस्यांची माहिती मान्यवरांना दिली माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद पुजारी डी आर पाटील दर्शन वडेर यांनी आपल्या मनोगतामधून वृत्तपत्र विक्रेते व एजंटांच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.यावेळी विविध दैनिकांचे वितरण प्रतिनिधी रवींद्र पाटील सिराज भोरे वृत्तपत्र विक्रेते व एजंट संघटनेचे अरविंद बेनीचेटके संजय कांबळे मनोहर पाटील सुभाष इंगळे रमेश चव्हाण जंगम स्वामी युवराज पाटील चिदानंद कांबळे धनाजी खडके रणजीत पुदें अनिल माने छोटू सावंत ओंकार सावंत अनुराधा सावंत राकेश परीट आनंदा पुरे यांच्यासह शिरोळ तालुक्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेते व एजंट उपस्थित होते शिरोळ तालुका वृत्तपत्र विक्रेते व एजंट संघाचे उपाध्यक्ष नागेश गायकवाड यांनी आभार मानले.