प्रामाणिकपणा , सोसीकतेचे उदाहरण म्हणजे शिक्षक : अनिलकुमार यादव
शिरोळ / प्रतिनिधी
येथील यादव प्रेमी ग्रुपच्या वतीने दत्त साखर कारखान्याचे संचालक व माजी सरपंच अनिलकुमार यादव यांच्या हस्ते
खर्डेकर पतसंस्थेच्या निवडणुकीत विजयी मिळविल्याबद्दल नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला.दरम्यान, विजयी नूतन संचालकांनी यादव यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर हा सत्कार समारंभ झाला.
यावेळी बोलताना अनिलकुमार यादव म्हणाले जीवनामध्ये ज्ञानमंदिर आणि शिक्षकांना फार महत्त्व आहे.शिक्षक हा समाजाचा दिशादर्शक असून भाविक पिढी घडवण्याचे सामर्थ्य केवळ शिक्षकांमध्येच असते . प्रामाणिकपणा आणि सोसीकतेचे उदाहरण म्हणजे शिक्षक असतो. खर्डेकर पतसंस्थेने सहकारात आदर्श निर्माण केला असून या संस्थेच्या नूतन संचालकांनी सभासदांचा विश्वास सार्थ ठरवावा असे आवाहन त्यांनी केले.रविकुमार पाटील ,चेअरमन सुनील एडके यांनी मनोगत व्यक्त केले.खर्डेकर पतसंस्थेचे संचालक रविकुमार पाटील, सुनील एडके,विजय भोसले ,प्रकाश खोत यांचा सत्कार सेवानिवृत्त नायब तहसीलदार बाळासाहेब कोळी,दत्त ऊस वाहतूक संघटनेचे धनाजी पाटील -नरदेकर व बापू गंगधर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी मोजम चौगुले,सुनील कोळी नूतन संचालक अरुण कदम,रमेश बनणे,संतोष कोळी,प्रशांत कांबळे,सुधीर पाटील ,उत्तम कोळी,बबलू सनदी,नियाज पटेल,प्रकाश पुजारी,विलास जानकर,अमित काटकोळे, कुमार सिदनाळे आदि उपस्थित होते