शिरोळ / प्रतिनिधी –
येथील कदम गल्ली मधील कै अमर शंकर बिसुरे यांचे अकस्मित निधन झाल्याने बिसुरे कुटुंबीय हातबल झाले होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन खासदार धैर्यशील माने यांनी ‘त्या ‘ कुटुंबीयांना आधार देत आर्थिक सहाय्यतेच्या मदतीसाठी सहकार्य केले.बिसुरे कुटुंबियाची परिस्थिती बेताची असून कुटुंब प्रमुख कै अमर बिसुरे ( वय ४५ वर्षे ) यांनी नैराशेतून आत्महत्या केली. घरचा कुटूब प्रमुख अचानक निघून गेल्याने पत्नी कल्पना यांच्यासह आई , मुलांसह दोन भावंडासमोर संकट उभे राहिले. याबाबत भाजपाचे संजय शिंदे व शिवसेना नगरसेवक रणजीत पाटील यांनी खासदार माने यांना ही वस्तूस्थिती सांगितली.त्यामुळे खासदार माने यांनी कै अमर बिसुरे हे काम करीत असलेल्या कुपवाड येथील कंपनी मालकाशी तात्काळ संपर्क साधून अर्थसहाय करण्याची विनंती केली. कंपनीच्या माध्यमातून बिसुरे कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा लाभ मिळाला. त्याशिवाय दोन्ही मुलांचा शिक्षणाचा खर्च, बालसंगोपन योजना, संजय गांधी निराधार योजना, प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन अशा शासकीय योजनासह इतर मदत करण्यात आली आहे.
या मदतीबाबत बिसुरे कुटुंबीयांनी प्रत्यक्ष भेटून अर्थसहाय्य व मानसिक आधार दिल्याबद्दल खासदार माने यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान ,बिसुरे कुटुंबीयांच्या मदतीसाठी खासदार माने, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, नगरसेवक रणजीत पाटील, भाजपा शिरोळ शहराध्यक्ष संजय शिंदे, वैभव पाटील, सागर ऐवाळे, भरत माने यांच्यासह शासकीय अधिकारी तसेच श्रीराम कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अनमोल सहकार्य लाभले .