साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी पाटील यांचे निधन

साताऱ्याचे खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी पाटील (वय ७६) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले.पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांच्या त्या मातोश्री होत्या.रजनीदेवी पाटील या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या.सध्या त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते.शुक्रवारी त्यांची प्रकृती बिघडली आणि वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २६ जुलै १९४८ रोजी सैनिकी परंपरा असणाऱ्या सातारा तालुक्यातील चिंचणेर वंदन येथील बर्गे कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता.१६ मे १९६८ रोजी त्यांचा श्रीनिवास पाटील यांच्याशी विवाह झाला.सनदी अधिकारी म्हणून प्रशासकीय आणि त्यानंतर राजकीय,सामाजिक जीवनात रजनीदेवी यांनी श्रीनिवास पाटील यांना खंबीर साथ दिली.त्यांचे पार्थिव कराडमध्ये आणले जाणार आहे. कराडच्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Spread the love
error: Content is protected !!