आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भूकंप होणार आहे आणि हा भूकंप विरोधक झेलू शकणार नाहीत असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट केला.शिवडी-न्हावाशेवा हा फक्त एक मार्ग नाही तर विजयाच्या दिशेने घेऊन जाणारा हा विकासाचा महामार्ग आहे.अबकी बार ४०० पार हा नारा मजबूत करण्यासाठी आमची जबाबदारी वाढली आहे.महाराष्ट्रात ४५ पार खासदार निवडून येणार आहे.मागे महाराष्ट्र थांबला होता.महाराष्ट्राचा विकास थांबला होता.तो मोदी यांच्या आशीर्वादानं सुरू झाला आहे.महाराष्ट्रामध्ये सर्वांत जास्त इन्फ्रा प्रोजेक्ट सुरू आहेत.हा फक्त एक प्रकल्प नसून गेम चेंजर प्रोजेक्ट आहे.जो पूर्ण अर्थव्यवस्था बदलणार आहे.आमचे जे जे प्रस्ताव केंद्रात जातात त्यामध्ये कुठलीही कपात न करता ते मान्य केले जातात असा खुलासाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.