जयसिंगपूर / प्रतिनिधी
अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीतही जिद्द व परिश्रमाच्या जोरावर आपला व्यवसाय समर्थपणे पार पाडताना सामाजिक भान न विसरलेल्या व्यावसायिकांना रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी जयसिंगपूरच्या वतीने व्यावसायिक सेवा पुरस्कार २०२३-२४ प्रदान करण्यात आले.रोटरी ग्रीन सिटी ट्रस्ट हॉल,छत्रपती शाहू इंडस्ट्रियल इस्टेट आगरभाग शिरोळ येथे एका शानदार कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आले.एस.व्ही.सेफ्टी सर्व्हिसेसच्या सौ.वैशाली सुरेश शिंदे या एक महिला व्यावसायिकेचाही पुरस्कार प्राप्त मध्ये समावेश आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना क्लर्क पासून मॅनेजर व कुशल व्यावसायिक म्हणून नाव कमावले आहे. व्यवसाय सांभाळतानाही आपल्या दोन्ही कन्येंना उच्च शिक्षण देवून स्वतःच्या पायावर उभे केले. व्यवसाय सांभाळतानाही सामाजिक भावनेतून अनेक गरजू व गरिबांना मदत ही केली. अत्यंत नम्रतेने व आपुलकीच्या भावनेने आपला व्यवसाय सांभाळत आहेत.याची दखल घेवून पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन उदगाव ग्रामपंचायतस्तरीय “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार -२०२३-२४चा पुरस्कारही मिळाला आहे.
डिस्ट्रिक्ट गर्व्हनर,रोटरी डिस्ट्रीक्ट ३१७० रोटे.नासिर बोरसादवाला यांचे शुभहस्ते पुरस्कार देण्यात आले.याप्रसंगी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी,व्होकेशनल अॅवार्ड रोटे.शिवराज पाटील,असिस्टंट गव्हर्नर रोटे.राजेश कोडुलकर,प्रेसिडेंट रोटे.सुदर्शन कदम,सेक्रेटरी रोटे.सचिन रायनाडे,व्होकेशनल सर्व्हिस डायरेक्टर रोटे.बजरंग खामकर यांचेसह,सर्व क्लब सदस्य,पुरस्कार प्राप्त व्यक्ती -विजय भूपाल पाटील मजलेकर,अजित भूपाल चौगुले,धनपाल व अरविंद बाबूराव मगदूम,राजाराम आनंदा चौगुले हजारे,सुनिल शिवाजीराव बंडगर,वैशाली सुरेश शिंदे,त्यांचे नातेवाईक, व्यावसायिक उपस्थित होते.