जयसिंगपूर / प्रतिनिधी
ग्लोबल स्काॅलर फाउंडेशन यांच्याकडून देण्यात येणारा राज्यस्तरीय उद्योग भुषण पुरस्कार बेस्ट सिव्हिल इंजिनियर व प्रस्पेक्टिव्ह डिझाईन याकरिता घोसरवाड गावचे सुपुत्र व सध्या जयसिंगपूर येथील प्रसिद्ध इंजिनियर श्री शितल लक्ष्मण बारवाडे यांना सन्मानित करण्यात आले.यशदा एडिटोरियम पुणे येथे झालेल्या शानदार समारंभात प्रसिद्ध फोटोग्राफर पद्मश्री सुधारक ओलवे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
शितल बारवाडे हे जयसिंगपूरसह कोल्हापूर जिल्हा तसेच सांगली परिसरात प्रसिद्ध आर्किटेक्चरल इंजिनिअर व लँड डेव्हलपर क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. अनेक शासकीय व खाजगी कार्यालयाची कामे ते करत असतात.पर्स्पेक्टिव्ह क्षेत्रात त्यांचा हातखंडाच आहे या कामाद्वारे त्यांनी पूर्ण पश्चिम महाराष्ट्र आपला एक वेगळा छटा नोंदवला आहे त्याचबरोबर लँड डेव्हलपमेंट व एन.ए. कामात त्यांची एक वेगळीच ओळख आहे.हे सर्व काम ते निस्वार्थ व सेवाभावी भावनेने करत असतात त्यामुळे त्यांना या भागातील अवलिया इंजिनिअर म्हणून ओळखले जाते ,अशा या अवलिया इंजिनियर ना ग्लोबल सोशल फाउंडेशन मार्फत यशोदा ऑडिटोरियम पुणे येथे उद्योग भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी ग्लोबल फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील बेळगावे,गिरीष्मा जाधव, सुनीता मॅडम व निरजा आपटे यांच्या सुमधुर सुत्र संचालनाने हा कार्यक्रम पार पडला.यावेळी इतर पुरस्कारते मान्यवर व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.