कुरुंदवाड / प्रतिनिधी
विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला निकाल हा भारतीय जनता पार्टीच्या गुलामगिरीतून दिला आहे. 2024 च्या निवडणुकीत जनताच या भाजप प्रणित मिंदे गटाला प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असा घनाघात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव उगळे यांनी हाणला.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे शिवसेनेच्या (उबाठा) गटाच्या विरोधात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.अध्यक्ष नार्वेकरांच्या प्रतिमेला जोडे मारुन,दहन करत बोंब-ठोक करत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.यावेळी बोलताना माजी तालुकाप्रमुख दयानंद मालवेकर म्हणाले विधानसभा अध्यक्षनी दिलेला निर्णय निर्लज्जपणाचा कळस आहे, लोकशाहीची हत्या करणारा आहे.यामुळे देशाचे भवितव्य अडचणीत येणार आहे.भाजपाला आपलं संविधान बदलायचे आहे.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान भाजपला मान्य नाही हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू असून 2024च्या निवडणुकीत भाजपला हद्दपार करणे गरजेचे आहे.यावेळी सुहास पसोबा,आप्पासाहेब भोसले,महिला आघाडी प्रमुख मंगलताई चव्हाण वैशाली जुगळे, सुरेश बींदगे आदींनी भाषणे केली.यावेळी प्रतिक धनवडे,राजू बेले,सुहास पासोबा, रामभाऊ माळी,स्वप्नील चव्हाण,आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.