कुरुंदवाड / प्रतिनिधी
येथील साधना मंडळाच्यावतीने पुरुष खुल्या गटातील 55 किलो वजनी गटातील निमंत्रित भव्य कबड्डी व शिरोळ तालुका मर्यादित 12 व 15 वर्षाखालील व खुल्या गटातील कुस्ती स्पर्धा स्व.सदाशिव गणपतराव लोकरे (इचलकरंजी) क्रीडानगरी कुरुंदवाड येथे 12 ते 15 जानेवारी अखेर होणार आहे.त्यामध्ये कोल्हापूर व सांगली विभागातील 20 संघ खुला गट व 55 किलो वजनी गटातील 30 संघ सहभागी होणार आहेत.12 तारखेला सायंकाळी स्पर्धेचे उदघाटन होणार आहे.अशी माहिती साधना मंडळाचे अध्यक्ष, सदाशिव सुभेदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
साधना मंडळाच्या स्वर्गीय डॉ.सा.रे पाटील सभागृहात पत्रकार परिषदेच्या प्रारंभी पत्रकार दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला ज्येष्ठ पत्रकार सुरेश कांबळे तालुका पत्रकार संघाचे खजिनदार संतोष तारळे बाबासाहेब मोरे साधना मंडळाचे अध्यक्ष स.ग. सुभेदार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .येथील तबक उद्यान येथे 41 व्या कबड्डी व कुस्ती स्पर्धांचे आयोजन 12 ते 15 जानेवारी अखेर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने माजी नगरसेवक, स्व. सदाशिव गणपतराव लोकरे (इचलकरंजी) यांच्या स्मरणार्थ येथील क्रीडानगरीत विद्युत झोतात घेण्यात येणार आहेत.
या स्पर्धेसाठी कबड्डी पुरुष खुला गट 20 संघ व 55 किलो वजनी गटातील 30 संघ कबड्डी स्पर्धेसाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून निमंत्रित निमंत्रित केले असून या स्पर्धा साखळी पद्धतीने खेळवल्या जाणार आहेत. या स्पर्धा 55 किलो वजनी गटातील सामने 12 जानेवारी रोजी 4 वाजले पासून सुरू होतील. तर पुरुष खुला गटातील सामने 13 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता सुरू होतील.
या स्पर्धेत वैयक्तिक, उत्कृष्ट खेळाडू, उत्तम चढाई व पकड यांनाही बक्षिसे देण्यात येणार आहेत. विजेत्या संघांना प्रथम क्रमांक 41 हजार व कायम चषक, द्वितीय क्रमांक 31 हजार व कायम चषक, तृतीय क्रमांक 21 हजार व कायम चषक तर सर्वांसाठी 55 किलो खालील संघाच्या कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या आहेत.विजेत्या संघांना प्रथम क्रमांक 15 हजार व कायम चषक, द्वितीय क्रमांक 11 हजार व कायम चषक, तृतीय क्रमांक 7 हजार व कायम चषक शिवाय वैयक्तिक उत्कृष्ट खेळाडू, उत्तम चढाई व पकड यांना ही बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धा बाद पद्धतीने खेळण्यात जाणार आहेत.
तर मॅटवरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा 12 व 15 वर्षाखाली व खुल्या गटात घेण्यात येणार आहेत.पैलवानांचे वजन सकाळी 9 ते 12 या वेळेत घेणार आहे. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकांना बक्षीस देण्यात येणार आहे.अशी माहिती अध्यक्ष सदाशिव सुभेदार यांनी दिली.या पत्रकार परिषदेला जयपाल बलवान,अब्बास पाथरवट, के.एस. दानवाडे, वैभव उगळे, महावीर पोमाजे, महावीर कडाळे, महादेव कुंभार, बापूसो दळवी आदी उपस्थित होते.