संपूर्ण शिरोळ तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या अर्जुनवाड येथील सिध्दू आग्नू पाटील गोकूळ सहकारी दूध संस्थेची पंचवार्षिक निवडणुकीत विरोधी आघाडीने बाजी मारत दूध संस्थेत सत्ताधारी गटाकडून सत्ता मिळवण्यात विरोधी आघाडीला यश मिळाले आहे. अर्जुनवाड येथील सिध्दू आग्नू पाटील गोकुळ सहकारी दूध संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली.या निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी दूध सहकार विकास आघाडीचे सहा उमेदवार तर सत्ताधारी श्री अर्जुनेश्वर परिवर्तन पॅनलचे पाच उमेदवार विजयी झाले.अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत अर्जुनवाड गावातील मातब्बर नेते मंडळींची प्रतिष्ठा पणाला लागली होती.मतदानापासून अखेरच्या निकालापर्यंत उमेदवार तसेच सभासदांची घालमेल सुरू होती. ४१७ मतदानापैकी ४०५ उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.एकूण ११ जागेसाठी २१ उमेदवार रिंगणात होते.९७% मतदान झाले असून निवडणूक प्रक्रिया शांतेत पार पडली.दरम्यान विजयी उमेदवारांनी ना गुलाल,ना फटाक्याच्या आतिशबाजी, ना हारतूरे याला सर्व गोष्टींना फाटा देत एक वेगळा आदर्श घालून दिला.विजयी झालेले उमेदवार व मिळालेली मते पुढीलप्रमाणे
महेश भीमसेन चौगुले – २१५
२)प्रकाश आप्पासो झांबरे -१९६
३) सतीश बाबुराव ढवळे -१९५
४) संदीप चंद्रकांत धनवडे -१८८
५) योगेश प्रकाश पाटील -१८७
६)आनंदा आकाराम महाडीक -१८६
७) वंदना अविनाश पाटील – २२५
८) छबुताई बाळासो ढवळे – २१४
९) जोतिबा आण्णासो गंगधर -२४२
१०) बबन कृष्णा उगारे – १९६
११) सुवर्णा भैरू कांबळे – २१९
अदि उमेदवार विजयी झाले आहेत.
चौकट –
भटक्या विमुक्त जमाती विशेष मागास प्रवर्गातील बबन कृष्णा उगारे व तुकाराम बाळू डोंगरे या दोन उमेदवारात एका मताचा फरक होता.त्यामुळे राजर्षी शाहू शेतकरी दूध सहकार विकास आघाडीने या दोन्ही उमेदवारांची फेर मत मोजणीची मागणी केली,फेर मत मोजणी नंतरही बबन कृष्णा उगारे विजयी झाले.