“ब्रेकिंग” पुलावरून गाडी खाली कोसळल्याने गाडीचा चक्काचूर

उदगाव अंकली टोल नाक्यावरील ब्रिटिशकालीन पुलावरून रेनॉल्ट कंपनीची आलिशान चारचाकी गाडी थेट पुलावरून खाली कोसल्याने गाडीचा चक्काचुर झाला आहे.यावेळी गाडीतील एअरबॅग ओपन झाल्याने चालक व अन्य दोघेजण जखमी झाले आहेत.

 

जखमींना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की उदगाव-अंकली टोल नाक्यावर असणाऱ्या ब्रिटिशकालीन पुलावरून जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रेनॉल्ट कंपनीची गाडी एम एच 16 सी वाय 3607 ही थेट पुलावरून नदीपात्रात

 

कोसळली यामध्ये गाडीचा अक्षरशःचक्काचुर झाला आहे.मात्र एअरबॅग वेळीच ओपन झाल्याने गाडीतील चालक व अन्य दोघे जणांना गंभीर जखमी झाले आहे असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक नागरिकांनी जखमींना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले.घटनास्थळी जयसिंगपूर पोलीसांनी

 

अपघाताची पाहणी केली.दरम्यान अपघात पाहण्यासाठी पुलावर नागरिकांनी व वाहन चालकांनी मोठी गर्दी केल्याने सुमारे एक तास वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.अपघाताबाबत अद्याप जयसिंगपूर पोलीस ठाण्यात नोंद झाली नाही तसेच अपघातातील जखमीची नावे ही समजू शकली नाहीत.

Spread the love
error: Content is protected !!