शिरोळात विविध संस्थांच्या वतीने पत्रकारांचा सन्मान
शिरोळ / प्रतिनिधी
भारत देशाच्या लोकशाहीत प्रसारमाध्यम हे चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो यामध्ये समाजाचा आरसा म्हणून प्रामाणिकपणे कर्तव्य बजावून पत्रकारांनी लोकशाही बळकटीसाठी मोलाचे योगदान दिले आहे असे प्रतिपादन राजश्री छत्रपती शाहू विद्यामंदिर क्रमांक १ या शाळेच्या मुख्याध्यापिका आशा शापुरे यांनी केले.
राजश्री शाहू विद्यामंदिर या शाळेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बाळासाहेब माळी चंद्रकांत भाट डॉ दगडू माने बाळासाहेब कांबळे संदीप इंगळे यांचा डायरी व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या.
माझी शाळा माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना पाठवलेल्या पत्राचे वाचन अध्यापक दीपक वावरे यांनी केले स्वागत व प्रास्ताविक अध्यापक बाळासाहेब कोळी यांनी केले पत्रकार डॉ दगडू माने चंद्रकांत भाट यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शाळेतील शिक्षक रमजान पाथरवट भारती इंगळे विमल वर्धन तेजश्री पाटील अश्विनी चुडमुंगे प्रियंका जगदाळे अण्णासाहेब पाटील यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येथील राजाराम विद्यालय क्रमांक २ या शाळेत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव कांबळे यांच्या हस्ते पत्रकार चंद्रकांत भाट यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी माजी उपनगराध्यक्षा करुणा कांबळे, मुख्याध्यापिका नीता चव्हाण,अध्यापिका त्रिशला येळगुडे, मीनाक्षी हेगाण्णा,शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा शितल जगदाळे,सदस्य प्रियांका इंगळे,रवींद्र पाटील,मारुती जाधव यांच्यासह मान्यवर विद्यार्थी उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते खंडेराव हेरवाडे यांनी ही पत्रकारांना पेन भेट देऊन शुभेच्छा दिल्या रेणुका मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी यांच्या वतीने सुद्धा पत्रकारांचा सत्कार करून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.विविध क्षेत्रातील मान्यवर लोकप्रतिनिधी सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष भेटून दूरध्वनीद्वारे पत्रकार दिनानिमित्त शिरोळ मधील सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.