कांचन हेरवाडे व साधना पाटील यांचा सेवानिवृत्ती सत्कार

कुरुंदवाड / प्रतिनिधी

शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी घडवित असताना शिक्षकांचे योगदान मोठे आहे. कुरुंदवाड शहरातील कुमार विद्या मंदिर नंबर 3 मधील विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षकांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होत आहे.

 

कांचन हेरवाडे व साधना पाटील यांनी आपल्या वेगळ्या कार्यशैलीतून विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन शाळेचे नाव उंचावर नेले आहे. त्यांनी केलेले शैक्षणिक कार्य कौतुकास्पद व आदर्शवत आहे, असे प्रतिपादन शाळा नंबर ३ चे मुख्याध्यापक रवीकुमार पाटील यांनी केले.

 

कुमार विद्यामंदिर नंबर ३ मधील कांचन हेरवाडे व साधना पाटील यांचा सेवानिवृत्ती सत्कार करण्यात आला यावेळी रविकुमार पाटील बोलत होते.सत्काराला उत्तर देताना हेरवाडे व पाटील म्हणाल्या,शिक्षण सेवेत कार्य करीत असताना ग्रामीण आणि गरीब विद्यार्थ्याला मोठे करण्याचे काम जिल्हा परिषद शाळा करीत आहे.

 

या शाळेत शिकवण्याची संधी आम्हाला मिळाली आणि शिक्षण क्षेत्रातील सहकार्‍यांनी दिलेली साथ ही लाख मोलाची ठरली असल्याचे सांगितले.यावेळी शंकर दिवटे, कृष्णात आंबी,संजय कोळी,सतिश कांबळे,किरण माने, अरुण नवाळे,हणमंत पडलकर,विकास लाटकर,प्रकाश पुजारी, स्मिता फल्ले, सुवर्णा भोई, रितू पाटील,

 

रागिणी पाटील,शंकर दास,वैशाली स्वामी,संपदा पाटील, रंजना माने,चंद्रलेखा चिगरे,सुनीता नेजे,माळी मॅडम, सावित्रि नवाळे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!