श्री बिरेश्वर संस्था अतिशय विश्वासार्ह संस्था – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा राज्यात जोल्ले ग्रुपच्या बिरेश्वर संस्थेचे पदार्पण
निपाणी / प्रतिनिधी
गोवा येथील फोंडा शहरात जोल्ले ग्रुपची सहसंस्था श्री बिरेश्वर को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.एकसंबा (मल्टी-स्टेट) शाखा-फोंडा 195 व्या नूतन शाखेचे उदघाटन गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज पार पडले.यावेळी जोल्ले समूहाचे संस्थापक चिक्कोडी लोकसभा मतदार संघाचे खासदार अण्णासाहेब जोले व स्थानिक नेते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.तर शाखेचा शुभारंभ फित कापून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले,अनेक वर्षांपासून बीरेश्वर संस्थेचे काम पाहत आलो आहे,गेल्या वर्षी या शाखा सुरू व्हायला हव्या होत्या,परंतु फोंडा आणि टिस्क उसगाव शहरात अन सुरू करण्यात आल्या. बिरेश्वर संस्था ही एक अतिशय विश्वासार्ह संस्था आहे.जी गोवा राज्यातील लोकांच्या आर्थिक प्रगतीसाठी मदत होणार आहे.पैशाच्या व्यवसायासोबतच केंद्र आणि राज्य सरकारचे प्रकल्प ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत करते.जनतेने आपला व्यवहार करून शाखेच्या प्रगतीसाठी सहकार्य करावे असेही ते यावेळी म्हणाले जोल्ले ग्रुपचे संस्थापक व चिक्कोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी संस्थेच्या प्रगतीविषयी सांगून संस्थेच्या सेवांची माहिती दिली.यावेळी कन्नड साहित्य परिषद गोवा अध्यक्ष सिद्दण्णा मेटी,प्रसिद्ध उद्योगपती शांताराम कोळवेनकर, नगरसेविका सौ.दीपा कोळवेनकर,वीरेंद्र डवळी,अपूर्व दळवी,चंद्रकांत पाटील, बिरेश्वर संस्थेच्या अध्यक्ष डॉ.जयानंद जाधव,उपाध्यक्ष श्री.सिद्रामा गडदे,हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पवन पाटील,संचालक शरद जंगटे,जोल्ले समुहाच्या सर्व संस्थांचे संचालक,संस्थेचे महाव्यवस्थापक रवींद्र चौगला,उपमहाव्यवस्थापक बहादुर गुरव,व कर्मचारी वर्ग,सदस्य उपस्थित होते.
Spread the love
error: Content is protected !!