कृषी पंपाची विज बिलासंदर्भात महावितरण वर मोर्चा काढणार – धनाजी चुडमुंगे

शिरोळ / प्रतिनिधी
प्रामाणिक कर्जभरणाऱ्या शेतकऱ्यांना चुकीचे निकष लावून ५० हजार रुपये अनुदानापासून अपात्र ठरवले गेले आहे.त्यांना पात्र करण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची लवकरच भेट घेणार असल्याचे सांगितले.येथील शेतकरी वजन काट्यावर आंदोलन अंकुश संघटनेच्या जनसंपर्क कार्यालय प्रवेश कार्यक्रम प्रसंगी धनाजी चुडमुंगे बोलत होते.यावेळी आम आदमी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन कदम यांच्या शुभहस्ते फीत कापून कार्यालय प्रवेश करण्यात आला.चुडमुंगे पुढे म्हणाले महावितरणकडून यापूर्वी मीटर वरील युनिट प्रमाणे बिल आकारणी केली जात होती.पण मागील तिमाही पासून महावितरणच्या फिडर वरील रिडींगची सरासरी काढून शेतकऱ्यांना विज बिल आकारणी केली जात आहे. त्यामुळे लहान शेतकऱ्यांना वापराच्या दुप्पट बिले आली आहेत.ही वाढून आलेली विज बिले पूर्वीप्रमाणे मीटर वरील रिडींग नुसार द्यावीत या मागणीसाठी नवीन वर्षात जयसिंगपूर महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.त्याचबरोबर प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने ५० हजार रुपये अनुदान जाहीर केले.पण ते देताना चुकीचे निकष लावून शेतकऱ्यांना अपात्र ठरवले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक सोसायटीतील १०० ते १५० शेतकऱ्यांना अशा प्रकारे अनुदानापासून वंचित ठेवले गेले आहे.अशा शेतकऱ्यांना एकत्र करून जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हा बँकेचे चेअरमन हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन त्यांना पात्र करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी बोलून दाखविले. यावेळी सुदर्शन कदम म्हणाले आंदोलन अंकुश ही संघटना लोकांच्या हितासाठी प्रामाणिकपणे लढणारी संघटना आहे.त्यामुळे या संघटनेचा येत्या काळात मोठा विस्तार होणार असून त्यांचं काम हे आदर्शवत आहे. सध्याच्या राजकीय पर्यायांना जनता विटली असून नवं प्रामाणिक नेतृत्व पुढे आल्यास जनतेलाही ते हवे आहे. त्यामुळे या संघटनेला राजकीय भविष्य पण आहे असं नाईक यांनी मत व्यक्त केले.प्रारंभी तालुका उपाध्यक्ष संभाजी शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले.तर जिल्हाध्यक्ष राकेश जगदाळे उपाध्यक्ष उदय होगले,तालुकाध्यक्ष दिपक पाटील,कृष्णा देशमुख,महेश जाधव यांनी याप्रसंगी मनोगते व्यक्त केली.यावेळी आम आदमी पक्षाचे जयंती पटेल यांच्यासह आंदोलन अंकुशचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
Spread the love
error: Content is protected !!