नृसिंहवाडी / प्रतिनिधी
लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आज दत्त जयंती निमित्त येणाऱ्या भाविकांचे सर्वच सामाजिक, व्यावसायिक,ग्रामपंचायत यांच्या वतीने स्वागत करण्यात येते.शिरोळ तालुका श्री दत्त मूकबधिर ग्रुप यांच्या वतीने गेली आठ वर्ष भाविकांना चहा व अल्पपारची सेवा अविरतपणे चालू ठेवले आहे त्यांच्या या सेवेचे सांगली कोल्हापूरसह राज्यभरातून येणाऱ्या दत्त भक्तांच्या कौतुक होत आहे.दत्त जयंती निमित्त नृसिंहवाडी येथे सांगली, इचलकरंजी व जयसिंगपूर आदी भागातील भाविक रात्री पासून चालत दर्शनासाठी येतात या येणाऱ्या भाविकांना सामाजिक भावनेतून शिरोळ तालुका श्री दत्त मूकबधिर ग्रुपच्या वतीने प्रत्येक वर्षी नृसिंहवाडीच्या स्वागत कमानी जवळ चहा व अल्पोपहार हार देण्याची व्यवस्था करण्यात येते,अल्पोपहार देऊन त्यांचे कार्य थांबत नाही तर त्या ठिकाणी झालेली अस्वच्छता ही सगळी एकत्र करून परिसर स्वच्छ केला जातो. त्यांच्या या सेवेला राज्यभरातून दत्त दर्शनासाठी येणाऱ्या आबालवृद्धासह तरुण भाविकांनी ही सलाम केला आहे. बोलता व ऐकता येत नसूनही त्यांच्या मनातील असणारी सामाजिक भावना याचे मृर्तीमंत उदाहरण त्यांच्या या गेल्या आठ वर्षाच्या सेवेतुन दिसून येत आहे.कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना तालुक्यातील ग्रुपच्या वतीने निस्वार्थ भावनेने व स्वखर्चातून हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो.यावेळी दत्त मूकबधिर ग्रुपचे अध्यक्ष अमोल निकम,उपाध्यक्ष अभिजीत माळी,सचिव गणेश हिप्परकर,खजिनदार स्वप्निल गायकवाड,उपखजिनदार प्रसाद पाटील, सदस्य श्रेयस पाटील,नेमिनाथ मेनीकार, आकाश माने, सौरभ साळवे, पंकज सोनावले, रोहित शिगाकाल, सुरज जठार यांच्यासह ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.