इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी शहरातील गावभाग परिसरात असणाऱ्या गुजरी पेठेतील संपत माळकर यांचे फटाक्याचे दुकान
आहे.या ठिकाणी सकाळच्या सुमारास शॉर्टसर्किटने दुकानाला आग लागून सुमारे अडीच लाख रुपयेची नुकसान झाले आहे.आगीची माहिती शेजारच्या नागरिकांना समजताच त्यांनी महापालिका अग्निशामक दलाला दिली.घटनास्थळी इचलकरंजी महानगरपालिकेच्या दोन अग्निशामक गाड्या दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.यामध्ये माळकर यांचे अडीच लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.तर या भागात भर वस्तीत दुकानाला आग लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.या घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाले आहे.दुकानाला आग लागल्यामुळे त्याच्या कुटुंबावर मोठा आघात कोसळला आहे.एवढे मोठे नुकसान कसे काय भरून काढायचे असा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला आहे घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.इचलकरंजी शहरातील गावभाग परिसरात असणाऱ्या गुजरी पेठेत जवळ संपत माळकर यांचे फटाके रांगोळी व इतर साहित्य विक्रीचे दुकान आहे.सकाळी सहाच्या सुमारास दुकानातून धूर येऊ लागला होता याची माहिती तेथील शेजारील त्यांना दिली.घटनास्थळी अग्निशामक दलाला देण्यात आली होती पण दुकानात शॉर्टसर्किटने आग लागल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते आगीने संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे.यामध्ये दुकानाचे साहित्य फटाके रांगोळी व इतर साहित्य जळून खाक झाल्यामुळे दुकानातील सुमारे अडीच लाख रुपयाचे नुकसान झाले आहे घटनास्थळी अग्निशामक च्या दोन गाड्या दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.तसेच मेन रोडवर दुकान असल्यामुळे व भर वस्तीत दुकानात आग लागल्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते आग विझवण्यात साठी नागरिकांनी सुद्धा मोठी धडपडत पाहायला मिळत होती शेजारीच असणाऱ्या दुकानाला त्या आगीची झळ बसत होती पण अग्निशामक वेळेवर आल्यामुळे आग विझवण्यात मोठे यश आले.संपत माळकर यांचे हे दुकान काही पूर्वीपासून गावाभाग परिसरामध्ये चालवत आहेत त्यांच्या दुकानाला आग लागल्यामुळे त्याच्या कुटुंबावर मोठा आघात कोसळला आहे एवढे मोठे नुकसान कसे काय भरून काढायचे असा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला आहे घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.आता माळकर कुटुंबांना कोणीतरी मदत करण्याची गरज बनली आहे या घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहेत.