शिरोळ तहसील कार्यालयातील राष्ट्रीय ग्राहक दिनाकडे शिरोळ महसूल तसेच सर्वच शासकीय अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने ग्राहक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला.तसेच
येत्या दोन दिवसात शिरोळ महसूल प्रशासनाने राष्ट्रीय ग्राहक दिन सर्व अधिकाऱ्यांचे समवेत साजरा नाही केला.तर जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांना निवेदन देऊन ग्राहक दिन पुन्हा साजरा करण्यासाठी भाग पाडू असा इशारा ग्राहक पंचायत जिल्हा सह संघटक सदाशिव आंबे यांनी दिला आहे.
ग्राहकांना हक्कांची जाणीव व्हावी आणि तो बाजारात खरेदीच्या हक्कांबाबत सक्षम व्हावा, यासाठी विविध संघटना जागरूकता निर्माण करतात.यासाठीच 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र 24 डिसेंबर रोजी शासकीय सुट्टी असल्याने आज 26 डिसेंबरला शिरोळ तहसील कार्यालय येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्या संदर्भात शिरोळ तहसील कार्यालयाने शिरोळ तालुक्यातील विविध ग्राहक संघटनांना निमंत्रित केले होते.मात्र निमंत्रण देऊनही या ग्राहक दिनाकडे शिरोळ पंचायत समिती बांधकाम विभाग वगळता,तहसीलदार अनिलकुमार हेळकर,नायब तहसीलदार योगेश जमदाडे तसेच शिरोळ तालुक्यातील सर्वच शासकीय अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने शिरोळ तालुक्यातील आलेल्या विविध ग्राहक संघटनांनी महसूल प्रशासनाचा निषेध व्यक्त करत फोटो पूजन व श्रीफळ वाढ न वाढवताच कार्यालयातून बाहेर पडले.त्यामुळे शिरोळ तहसील कार्यालयातील राष्ट्रीय ग्राहक दिनाचा बोजवारा उठला आहे.शिरोळ तालुक्यातील सर्वच शासकीय अधिकाऱ्यांना या ग्राहक दिनाचे महत्त्व नसल्याचे आरोप विविध ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.यावेळी ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे तालुकाध्यक्ष सुभाष माळी,शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे बी.ए.कांबळे, ग्राहक पंचायत महाराष्ट्र तालुकाध्यक्ष मेहबूब बागवान,अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरोळ तालुका अध्यक्ष राजेश शंभूशेटे, जिल्हा ग्राहक सहसंघटक सदाशिव आंबी,जिल्हा सदस्य डॉ.एस ए पाटील,
ग्रामपंचायत सदस्या वर्षा पाटील,गजानन देवताळे,शीर तालुका बांधकाम अभियंता एस के दबडे,अधीक्षक राजवर्धन पाटील,फिरोज अत्तार,अंधश्रद्धा निर्मूलनचे खंडेराव हेरवाडे यांच्यासह विविध ग्राहक संघटनेचे पदाधिकारी ग्राहक उपस्थित होते.