जयसिंगपूर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात दत्त जयंती उत्साहात साजरी

जयसिंगपूर / प्रतिनिधी

जयसिंगपुर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात श्री दत्तजयंती उत्साहात साजरी 2003 साली स्थापन झालेल्या मंदिरात आज या मंदिराचे वटवृक्षाचे रूपांतर झाले आहे.हजारोंच्या उपस्थित श्री जन्मोत्सव साजरा झाला.सकाळी पहाटे ५ वाजता अभिषेक काकड आरती 4.30 वा.शोडषोपचार पूजा व अभिषेक करण्यात आला.त्यानंतर सकाळी ८ ची भूपाली आरती संपन्न झाली.आरतीनंतर कुलदेवी व कुलदेवता यांचे अलंकार अर्पण व बलिपुर्णाहुती संपन्न झाली.दुपारी १२.३९ वा श्री दत्त जन्मकाळ झाला.दत्त जन्मकाळनंतर आरती करण्यात आली.आरतीनंतर भक्तांना मागदर्शन झाले.दत्तजयंती निमित्त सुरु असलेल्या अखंड नाम-जप,यज्ञ-याग सांगता झाली.तर बुधवारी दि २७ डिसेंबर सकाळी १०.३० वा महाआरतीने होणार आहे.सप्ताह काळात ४०० हुन अधिक लोक श्री गुरुचरित्र पारायणास बसले होते.शिरोळ तालुक व पंचकृषीती स्वामी भक्तांनी आज दर्शनासाठी गर्दी केली होती.दर्शनासाठी ठिकठिकाणी LED स्क्रीन लाऊन Live प्रक्षेपण मंदिराच्यावतीने करण्यात आले होते.दर गुरुवारी व शनिवारी दरबारात विनामूल्य मार्गदर्शन व प्रश्नउत्तरे सेवा केली जाते. दत्त जयंती निमित्त जयसिंगपूर शहर भक्तिमय बनले होते.
Spread the love
error: Content is protected !!