महेश चव्हाण यांची उबाठा शिवसेनेच्या जिल्हा उपप्रमुखपदी निवड! सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल; शिरोलीत समर्थकांकडून जल्लोषात स्वागत

Spread the love

महेश चव्हाण यांची उबाठा शिवसेनेच्या जिल्हा उपप्रमुखपदी निवड!

सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल; शिरोलीत समर्थकांकडून जल्लोषात स्वागत

पुलाची शिरोली | प्रतिनिधी कुबेर हंकारे

पुलाची शिरोली येथील महेश पांडुरंग चव्हाण यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या जिल्हा उपप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.

त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानाची दखल घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या निवडीमुळे शिरोलीच्या राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महेश चव्हाण यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिरोली ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून केली. स्थानिक प्रश्नांची जाण, जनसामान्यांशी असलेला संपर्क आणि विकासकामांतील सक्रिय सहभाग यांच्या जोरावर त्यांनी पुढे जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कामाचा अनुभव, संघटनात्मक कौशल्य आणि विविध क्षेत्रांतील सामाजिक योगदान यामुळे त्यांनी परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने जिल्हा उपप्रमुखपदाची जबाबदारी सोपविली असून, या माध्यमातून पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याबरोबरच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याची संधी त्यांना मिळणार आहे.

निवडीनंतर शिरोलीतील शिवसेनेच्या वतीने महेश चव्हाण यांचा जोतीराम पोर्लेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या सत्कारप्रसंगी अनिल खवरे, शिवाजी पोवार, सुरेश यादव, सुनील पाटील, संदीप कांबळे, सतीश रेडेकर, संतोष बाटे, मुकुंद नाळे, बंडा चव्हाण, नितीन चव्हाण आदी उपस्थित होते.

या निवडीसाठी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय चौगुले तसेच माजी पंचायत समिती सदस्य अनिल खवरे यांचे विशेष सहकार्य लाभले. महेश चव्हाण यांच्या निवडीमुळे शिरोलीच्या राजकीय क्षेत्रात त्यांचे महत्त्व वाढले असून, आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षसंघटनेला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!