इचलकरंजीतील पुरोहिताच्या हत्येप्रकरणी कठोर शिक्षेची मागणी; ब्राह्मण सभेच्या वतीने सदलगा पोलिसांना निवेदन

Spread the love

इचलकरंजीतील पुरोहिताच्या हत्येप्रकरणी कठोर शिक्षेची मागणी; ब्राह्मण सभेच्या वतीने सदलगा पोलिसांना निवेदन

​इचलकरंजी / सदलगा

इचलकरंजी येथील पुरोहित मंदार अजित रानडे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आणि मारेकऱ्यांना कठोर कायदेशीर शिक्षा मिळावी, यासाठी *ब्राह्मण सभा, इचलकरंजीच्या* वतीने सदलगा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बासगौडा नेरली यांना औपचारिक निवेदन देण्यात आले. आंतरजातीय विवाहाचे धार्मिक विधी पार पाडल्याच्या कारणावरून दिवसाढवळ्या झालेल्या या पुरोहिताच्या हत्येमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. ही अत्यंत निंदनीय, धक्कादायक आणि अमानुष घटना असून, सभ्य समाजात अशा प्रकारच्या हिंसेला अजिबात स्थान असू नये, असे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणाचा सखोल व निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात अशा घृणास्पद कृत्याची पुनरावृत्ती होणार नाही आणि ब्राह्मण समाजाच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लागेल, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी निवेदन देण्यासाठी संदीप कुलकर्णी, मनोज निगुडुकर, प्रसाद कुलकर्णी, किरण दंडगे, शैलेश गोरे, अनुप श्रीकांत हल्याळकर, प्रशांत कुलकर्णी, अविनाश मादुसकर, विनायक शिरोळकर, सुधीर कुलकर्णी, ज्ञानेश्वर कुलकर्णी, राजेंद्र चिंचलिकर, स्वरूप कुलकर्णी, अजित कुलकर्णी, अभिषेक कुलकर्णी, प्रसाद प्रकाश कुलकर्णी, श्रीकांत दत्तात्रय कुलकर्णी, सूरज बडवे, केदार देवधर, पार्थ कुलकर्णी, अथर्व कुलकर्णी, ​पराग श्री.पेठे, के. पुरुषोत्तम रानडे, आशिष अतुल रानडे, अटल वसंत रानडे, संजय गजानन पुजारी, भगवान कुलकर्णी यांच्यासह ब्राह्मण सभेचे पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते:यावेळी पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य ती कारवाई करावी आणि पिडीत कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली.

Leave a Comment

error: Content is protected !!