आमदार डॉ.अशोकराव माने यांचा वाढदिवसानिमित्त जनसंपर्क व सामाजिक उपक्रमांनी भरलेला दौरा

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांचा सोमवार, दि.१ जून रोजी वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक, लोकाभिमुख आणि जनसंपर्क कार्यक्रमांनी भरलेला दौरा आयोजित करण्यात आला आहे. दिवसभर मतदारसंघातील विविध ठिकाणी नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारण्याबरोबरच अनेक महत्त्वपूर्ण कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.

सकाळी ८.०० ते ११.०० या वेळेत शिरोळ येथे नागरिकांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी आमदार माने उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी ११.०० ते दुपारी १२.०० या वेळेत लाटवडे येथे श्री. शंकर पाटील यांच्या वाढदिवस सोहळ्यासह आयोजित आरोग्य शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२.०० ते १.०० या वेळेत पेठ वडगाव येथील जनसंपर्क कार्यालयात नागरिकांशी संवाद साधत वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारतील.

दुपारी १.०० ते २.०० या वेळेत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीस ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी २.०० ते ४.०० या वेळेत दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सूतगिरणी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सहभागी होत नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारतील. सायंकाळी ,४ वाजता शिरोळ येथील निवासस्थानीही नागरिकांना उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळी ५.०० वाजता शिरोळ नगरपरिषद आणि आमदार दलितमित्र डॉ.अशोकराव माने सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज चौक,शिरोळ येथे आयोजित ‘शिरोळ भूषण पुरस्कार २०२६’ वितरण सोहळ्यास आमदार माने प्रमुख उपस्थिती लावणार आहेत.या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे.दरम्यान, वाढदिवसानिमित्त हार-तुरे किंवा पुष्पगुच्छ न आणता विद्यार्थ्यांसाठी वह्या भेट स्वरूपात आणाव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.समाजोपयोगी उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याचा हा उपक्रम नागरिकांकडूनही कौतुकास पात्रठरत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!