हेरवाड / प्रतिनिधी
पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गेल्या २० वर्षांपासून रेंगाळत असून, हा संघर्ष आता अंतिम आणि निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. या संदर्भात येत्या १ जून २०२६ रोजी कुरुंदवाड येथे एक भव्य आणि निर्णायक आंदोलन छेडण्यात येणार आहे.या आंदोलनाची पूर्वतयारी आणि जनजागृतीसाठी बुधवार दिनांक २७ मे २०२६ रोजी सायंकाळी ठीक ७:०० वाजता हेरवाड येथील एस.टी. स्टँड चौक येथे ‘जागर सभा संपन्न झाली.पंचगंगा प्रदूषण मुक्तीच्या लढ्यात सहभागी व्हा असे आवाहन आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.रेखा जाधव होत्या.ते पुढे म्हणाले की,पंचगंगा नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी या भागात गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेला लढा आता शेवटच्या टप्प्यात आला असल्याचे म्हटले आहे.प्रोसेसवर कारवाई करण्यात महानगर पालिका कुचराई करीत असल्याने कृष्णेचे पाणी बंद करणार असल्याचे सांगितले “पंचगंगा नदी हे आपल्या भागाचे जीवनमान आहे.तिचे अस्तित्व वाचवण्यासाठी हा लढा अत्यंत महत्त्वाचा आहे. सगळे मिळून पंचगंगा वाचवूया,” असे आवाहन आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी केले आहे.प्रोसेसवाल्यांनी दूषित पाणी पंचगंगा नदीत सोडू नये, आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन दिपक पाटील यांनी केले.कृष्णात देशमुख म्हणाले की आपल्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या आंदोलन अंकुशला पाठींबा द्यावा. अध्यक्षस्थानावरून बोलताना सरपंच सौ. रेखा जाधव म्हणाल्या की निसर्गातील शास्वत ठेवा भावी पिढी पुढे व्यवस्थित रित्या देणे गरजेचे आहे.याप्रसंगी माजी सरपंच सुरगोंडा पाटील,ग्रा.पं.सदस्य सचिन पाटील,भरत पोवार, हयातचॉंद जमादार, विजयमाला पाटील,दयानंद पाटील, अविनाश पाटील,विश्वास बालिघाटे, पायगोंडा आलासे,रंजेश कडते,सरदार जमादार,सतिश कुरणे,प्रभाकर बंडगर, अजित अकिवाटे,युनुस जमादार,दिपक बंडगर यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचलन बंडू बरगाले यांनी केले. आभार ग्रा.पं.सदस्य भरत पोवार यांनी मानले.