कोल्हापुरात आदिवासी कोळी समाजाचा ४१ वा वधू-वर मेळावा उत्साहात
कोल्हापूर / प्रतिनिधी
येथील दसरा चौक परिसरातील शाहू स्मारक भवन येथे ‘भाग्यश्री आदिवासी कोळी समाज वधू-वर सूचक केंद्र,कोल्हापूर’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ४१ वा भव्य वधू-वर मेळावा अत्यंत उत्साहात आणि सकारात्मक प्रतिसादात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीएसएनएलचे सेवानिवृत्त अधिकारी डी.ए.कोळी होते.प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना दिलीप शिरढोणे सर म्हणाले,की वधूवराची निवड करताना केवळ इस्टेट न पाहता कर्तृत्व,शिक्षण, संस्कार पाहणे गरजेचे आहे.सुनेला मुली प्रमाणे वागविले तरच नाती टिकविता येतील.विवाह संस्था टिकविण्यासाठी पालकांचे संस्कार महत्त्वाचे आहे. डॉ.मनोहर कोळी,शशिकांत कोळी,एकनाथ सूर्यवंशी,हिम्मत कोळी, यांनी मार्गदर्शन केले.समाजातील तरुण-तरुणींना योग्य जोडीदार निवडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यात एकूण ७७ वधूवरांची नोंदणी करण्यात आली.मेळाव्याच्या नियमांनुसार वधू-वरांना प्रत्यक्ष उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले होते,ज्यामुळे पालकांना आणि उपवरांना एकमेकांशी थेट संवाद साधणे सोपे झाले.या मेळाव्यात दिलीप आप्पासाहेब कोळी,गंगाधर कल्याणकर,रामतात्या कोळी,रामभाऊ परचंडे,बाबासाहेब शिरगुरे यांचेसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील आदिवासी कोळी समाजातील असंख्य उपवर वधू-वर आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन भाग्यश्री वधू-वर सूचक केंद्राच्या संचालिका सौ.हेमलता अरुण कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरुण कोळी,संतोष कोळी,धीरज कोळी, अनिकेत कोळी,अवधूत कोळी, अमिताभ कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले.समाजातील जास्तीत जास्त घटकांनी या उपक्रमाचा लाभ घेतल्याबद्दल संयोजकांच्या वतीने उपस्थितांचे आभार अमित कोळी यांनी मानले.