जनतेच्या सेवेसाठी प्रशांत शहापूरे यांचे नरसोबावाडीत जनसंपर्क कार्यालय सुरू

Spread the love

नरसोबावाडी / प्रतिनिधी

आलास जिल्हा परिषद मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे युवा व लोकाभिमुख जिल्हा परिषद सदस्य प्रशांत दादा शहापूरे यांनी मतदार संघातील जनतेचे प्रश्न तत्परतेने सोडवण्यासाठी नरसोबावाडी येथे जनसंपर्क कार्यालयाची सुरुवात केली.या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यास परिसरातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.सदर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पंचायत समितीचे माजी सभापती तथा गणेशवाडीचे सदाशिव आंबे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रशांत शहापूरे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे शिरोळ तालुका अध्यक्ष महेश देवताळे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रशांत कुंभोजे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष महावीर अण्णा तकडे, पंचायत समितीचे माजी सभापती मल्लाप्पा चौगुले,औरवाडचे राजाराम रावण, रमेश चंदुरे, मुकुंद काका पुजारी, उदय काका शिरटीकर, गुरुदास खोचरे, जमीर पटेल, सुधीर शहापूरे, जी. के. शहापूरे (सर), राहुल राजमाने, प्रमोद भेंडवाडे, युनूस नदाफ, अविनाश कोल्हापुरे, दीपक बिदरे, अरुण राजमाने, नारायण नरके, सचिन कांबळे, अमोल दानोळे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी प्रशांत शहापूरे हे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असून हे जनसंपर्क कार्यालय नागरिकांसाठी प्रभावी संवादाचे व्यासपीठ ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. मतदार संघातील विकासकामांना अधिक गती देण्यासाठी तसेच नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी हे कार्यालय महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही सांगण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी प्रशांत दादा शहापूरे यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस यश लाभो,अशा भावना व्यक्त केल्या.

Leave a Comment

error: Content is protected !!